भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 14:50 IST2026-01-09T14:50:53+5:302026-01-09T14:50:53+5:30

जेथे अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याचे आपल्या सोबत असलेलेल ठाणे व पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या लक्षात ही बाब आणून दिली.

After Raj Thackeray's order in Bhiwandi, Mansainiks attack Bombay Dhaba, express anger by tearing down nameplate | भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप 

भिवंडीत राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांचा बॉम्बे धाब्यावर हल्ला,नामफलक फाडून व्यक्त केला संताप 


भिवंडी: सध्या महानगरपालिका निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे.प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांचे नेते ठिकठिकाणी भेटी देत आहेत.गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे हे कल्याणहून प्रचार संपवून भिवंडी मार्गे ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची नजर ठाणे भिवंडी सीमेवरील खारीगाव खाडीच्या ब्रिज नजीक असलेला "बॉम्बे ढाब्या" वर गेली.

जेथे अजूनही बॉम्बे ढाबा हे नाव असल्याचे आपल्या सोबत असलेलेल ठाणे व पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे जिल्हा प्रमुख परेश चौधरी आपल्या सहकाऱ्यांसह बॉम्बे ढाबा येथे दाखल होत. ढाबा व्यवस्थापकास येथील नाव तत्काळ बदलण्याच्या,येथील विद्युत साईन बोर्ड बंद करण्यास सांगून न थांबता मनसे सैनिकांनी येथील नामफलक फाडून आपला संताप व्यक्त केला

Web Title : राज ठाकरे के आदेश के बाद भिवंडी में मनसे कार्यकर्ताओं ने 'बॉम्बे ढाबा' पर हमला किया।

Web Summary : राज ठाकरे के आदेश के बाद, मनसे कार्यकर्ताओं ने भिवंडी में 'बॉम्बे ढाबा' पर हमला किया और नाम का विरोध किया। मनसे ने नगरपालिका चुनाव अभियान के दौरान तत्काल नाम बदलने और साइन हटाने की मांग की, नाम पट्टिका को फाड़कर अपना गुस्सा व्यक्त किया।

Web Title : MNS activists attack 'Bombay Dhaba' in Bhiwandi after Raj Thackeray's order.

Web Summary : Following Raj Thackeray's orders, MNS activists vandalized 'Bombay Dhaba' in Bhiwandi, protesting the name. MNS demanded immediate name change and removal of signage during the municipal election campaign, expressing their anger by tearing down the nameplate.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.