शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Tauktae Cyclone : चक्रीवादळावर मात करून भाईंदरच्या नाखवाने मच्छीमार बोटीसह ५ खलाशांना किनारी आणले सुखरूप 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 8:55 PM

Tauktae Cyclone : बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा व अन्य ५ खलाशी होते.

मीरारोड - तौत्के चक्रीवादळाच्या गर्तेत अडकलेली भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट मंगळवारी रात्री सुखरूप किनाऱ्याला लागली. नाखवा जस्टिन डायमंड मिरांडा यांनी भयावह अशा वादळावर मात करून तीन दिवस भर समुद्रात वादळाशी संघर्ष करत स्वतःसह ५ खलाशी यांचे जीव वाचवत बोटीसह सहीसलामत किनारा गाठला   मासेमारी हंगामाचे शेवटचे दिवस असल्याने मच्छीमार मोठ्या आशेने मासेमारीसाठी गेले होते. परंतु तौत्के चक्रीवादळाच्या इशाऱ्याने रविवार पर्यंत भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील सर्वच मच्छीमार बोटी परतल्या. परंतु डायमंड मिरांडा यांची न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट मात्र चक्रीवादळात अडकली. 

बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा व अन्य ५ खलाशी होते. रविवारी सदर बोट समुद्रातील ओएनजीसीच्या एका वापरात नसलेल्या इंधन विहरीच्या रिंगजवळ होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्र किनारा जवळ असल्याने तेथे आश्रयाला जा अशा सूचना होत्या. परंतु बोट सोडून परतणार नाही असा निश्चय करून जस्टिन हा बोटीसह भाईंदर किनारी येण्यास निघाला. परंतु सोमवारी चक्रीवादळाच्या तुफानाने बोट वादळात ओढली जाऊ लागली. खवळलेल्या समुद्रात बोट वादळामुळे किनाऱ्याच्या दिशेने सरकत नव्हती. नांगर टाकून बोट व स्वतःचे, खलाशी यांचे जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न त्यांचे होते. या दरम्यान वायरलेस वरून तो सतत कुटुंबीय आदींशी संपर्कात होता.

घरच्यांसह कोळीवाड्यात सुद्धा बोटीतील नाखवा व खलाशी सहीसलामत यावेत यासाठी प्रार्थना केली जात होती. तटरक्षक दलाचे हॅलिकॉप्टर बचावासाठी गेले खरे पण प्रचंड वारा असल्याने ते स्थिर राहू शकत नव्हते जेणे करून ते माघारी फिरले. वादळाने खवळलेल्या समुद्रात बोट टिकवून ठेवण्यासाठी तीन नांगर तुटले. शेवटी अन्य दोरखंड एकत्र करून त्याचा वापर केला. बोटीचे स्टिअरिंग बिघडल्याने जस्टिनने खवळलेल्या समुद्रात जाऊन बोटीची दुरुस्ती केली. आता पर्यंतच्या आपल्या आयुष्यात असे चक्रीवादळ कधी पहिले नव्हते. पण माझा मुलगा या भयानक चक्रीवादळावर मात करून स्वतः सह ५ खलाशी आणि बोटीला सहीसलामत परत घेऊन आला हे आम्हा मच्छीमारांसाठी मोठे अभिमानास्पद आहे असे जस्टिनचे वडील डायमंड मिरांडा लोकमतशी बोलताना म्हणाले.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळbhayandarभाइंदर