शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर भाजपाचे गिरे तो भी टांग उपर

By admin | Updated: September 11, 2015 00:49 IST

त्या २७ गावांना घेऊनच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे केडीएमसी परिसरात भाजपाला चपराक, अशा आशयाचे मेसेज

- अनिकेत घमंडी,  डोंबिवलीत्या २७ गावांना घेऊनच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे केडीएमसी परिसरात भाजपाला चपराक, अशा आशयाचे मेसेज सोशल मीडियावरून पसरविले जात आहेत. मात्र, हा निर्णय आयोगाने दिला असून मुख्यमंत्र्यांनी केवळ लोकभावना ओळखून जीआर काढला होता, असा पवित्रा भाजपाने घेतला आहे. तसेच आता आयोगाने त्याबाबतचा निर्णय घेतल्याने मुख्यमंत्री काय करणार, अशी गिरे तो भी टांग उपर, अशी भूमिका पक्षाने घेतली आहे.भाजपाच्या या खेळीमुळेही तीन दिवसांपासून मौनं सर्वार्थ साधनम् ही भूमिका घेतलेल्या शिवसेनेला या निर्णयामुळेही संजीवनी मिळाली नाही. मंगळवारच्या रात्रीपासून बुधवारच्या संध्याकाळपर्यंत पक्षाने कोणतीही भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात होते. राज्य शासनाच्या निर्णयामुळे अनेक इच्छुकांनी तातडीने दुकाने (आॅफिस) बंद करून बघ्याची भूमिका घेतली होती. अशांनी आयोगाचा निर्णय येताच गुरुवारी सकाळपासून पुन्हा कार्यालये थाटून त्यात ठाण मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यामुळे ठिकठिकाणी नागरिकांमध्ये नवख्यांविषयी चर्चा होती.मनसेच्या नेत्यांसह नगरसेवक, शहर कार्यकारिणीला गुरुवारी संध्याकाळी पक्षाध्यक्षांनी मुंबईत बोलावले होते. त्यामुळे त्यांना काय सूचना मिळतात, याकडे येथील तळागाळातला कार्यकर्ता नजर ठेवून आहे. गेल्या दोन दिवसांत त्या पक्षानेही भूमिका स्पष्ट न केल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांचीही कोंडी झाली होती.गुरुवारी तर्कांना उधाणआयोगाच्या या निर्णयामुळे काहींनी हे असेच होणार होते. संघर्ष समितीच्या राजकारणात भाजपा उजवी ठरली. त्यामुळे त्याचा फटका साहजिकच शिवसेनेला बसेल. मुख्यमंत्र्यांनी चांगुलपणाचा आव आणून चांगली खेळी केली. संघर्ष समितीचे जे उमेदवार असतील, ते भाजपप्रणीत असतील, अशा नानाविध तर्कवितर्कांना गुरुवारी दिवसभर उधाण आले होते.आयोगाच्या या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेणारजे नेते २० वर्षे संघर्ष करीत आहेत, ते स्थानिकांच्या न्यायहक्कासाठी धडपडत आहेत. त्यांना न्याय मिळायलाच हवा. आयोगाच्या निकषांवर आक्षेप असून त्याविरोधात दाद मागणारच. - नरेंद्र पवार, आमदार