शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ९ वर्षांनी मिळाला गुलामनबीला न्याय

By admin | Updated: March 24, 2017 01:08 IST

गेल्या नऊ वर्षांपासून स्वत:च्या जागेत झालेले बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणाऱ्या गुलामनबी सय्यद

भार्इंदर : गेल्या नऊ वर्षांपासून स्वत:च्या जागेत झालेले बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणाऱ्या गुलामनबी सय्यद या जागामालकाला आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी अखेर न्याय दिल्याने दिलासा लाभला आहे. मात्र, सय्यद यांच्या जागेवर पालिकेने बांधलेला रस्ता हटवण्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे. मीरारोडच्या नयानगर परिसरात गुलामनबी यांच्या मालकीची सुमारे १ हजार ५० चौरस मीटर जागा आहे. सर्व्हे क्रमांक ५२० हिस्सा २ मध्ये असलेल्या जागेलगत सेन्चुरी पार्क व ड्रीम एकर्स या इमारतींचा रस्ता शहर विकास आराखड्यानुसार प्रस्तावित करण्यात आला होता. दरम्यान, या रस्त्यावर लगतच्याच प्रीमियम इमारतीच्या सोसायटीचे कार्यालय २००८ मध्ये थाटण्यात आले. त्या कार्यालयाचा काही भाग गुलामनबी यांच्या जागेत बांधण्यात आला. त्याविरोधात त्यांनी पालिकेकडे तक्रार केली. परंतु, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दबावासह भ्रष्ट अधिकाऱ्यांंच्या गैरकारभामुळे दुर्लक्षित करण्यात आली. अखेर, गुलामनबी यांनी २०१२ मधील ‘लोकशाही दिना’त तक्रार करून न्यायाची मागणी केली. यानंतर, पालिकेने प्रीमियम सोसायटीला ते बांधकाम हटवण्याची नोटीस बजावली. सोसायटीने बांधकाम हटवणे तर दूरच राहिले, उलट पालिकेकडे ते बांधकाम नियमित करण्याचा अर्ज केला. परंतु, पालिकेने त्याला नकार दिल्याने सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही ते बांधकाम अवैध ठरवले. तरीदेखील पालिकेने ते बांधकाम हटवले नाही. तसेच तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानंतरही निगरगट्ट अधिकाऱ्यांनी त्या आदेशांना केराची टोपली दाखवली. गुलामनबी यांनी मुख्यमंत्र्यांसह लोकायुक्त व कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली. तरीही, कारवाई होत नसल्याने गुलामनबी यांनी कोकण आयुक्तांच्या ‘लोकशाही दिना’त तक्रार दाखल केली. त्यावर, २०१५ मध्ये कोकण आयुक्तांनी पालिकेला ते बांधकाम हटवण्याचे निर्देश दिले. तरीही, कारवाई झाली नाही. पालिकेकडे सतत तक्रारी व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याने गुलामनबी व त्यांचे कुटुंब हताश झाले होते. न्यायाच्या आशेने ते मुलांसोबत दररोज जोगेश्वरी येथून पालिकेत पायपीट करीत होते. अखेर, ६ मार्चला पार पडलेल्या ‘लोकशाही दिना’त त्यांनी तक्रार करून पुनश्च प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली. आयुक्त डॉ. गीते यांनी अतिक्रमण विभागाचे प्रमुख दीपक पुजारी यांना ते बांधकाम दोन दिवसांत हटवण्याचे निर्देश दिले. अखेर, त्या बेकायदा बांधकामावर बुलडोझर फिरला आणि तब्बल ९ वर्षांनंतर गुलामनबी यांना न्याय मिळाला. दरम्यान, ड्रीम एकर व सेन्चुरी पार्क या इमारतींकडे जाणारा रस्ता सर्व्हे क्रमांक ५२० हिस्सा २ वर प्रस्तावित असताना गुलामनबी यांच्या जागेत हा रस्ता बांधला. (प्रतिनिधी)