शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निकालानंतर प्रशासनाचे खच्चीकरण

By admin | Updated: May 12, 2017 01:47 IST

महापालिका निवडणूक झाल्यापासून प्रशासनाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून पालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : महापालिका निवडणूक झाल्यापासून प्रशासनाचे सातत्याने खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून पालिका अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले हे पूर्वनियोजित आहेत. राजकीय आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नसल्याची टीका महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पत्रकारांकडे केली. फेरीवाले, राजकारणी व गुंड यांची साखळी तोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयस्वाल यांना धमक्या आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतरही महापालिकेत शिवसेनेची स्वबळावर सत्ता आली. त्यामुळे जयस्वाल यांच्या टीकेचा रोख शिवसेनेकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.फेरीवाल्यांना रस्ते अडवून बसवण्यापासून ते त्यांच्याकडून घेतले जाणारे हप्ते आणि त्यांना वाचवणाऱ्या सर्व लोकांची यादीच तयार करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर संपूर्ण शहरभर व्यापक कारवाई करण्यात येणार असून सर्व राजकीय पक्षांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे जयस्वाल म्हणाले. मात्र, कारवाई करताना कितीही राजकीय विरोध झाला, तरी या विरोधाला आता जुमानणार नाही, असा स्पष्ट इशारादेखील जयस्वाल यांनी दिला. माळवी यांच्यावरील हल्ला व्यक्तीवरील हल्ला नसून पालिका प्रशासनावरील हल्ला असल्याचे त्यांनी नमूद केले. आता प्रशासनाविरोधात फेरीवाले असा सरळ संघर्ष सुरू झाला असून यापुढे मी स्वत: रस्त्यावर उतरून फेरीवाल्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माळवी यांच्यावर जेव्हा हल्ला झाला, तेव्हा अनेक नागरिक तेथे उपस्थित होते. त्यांनी पुढे यायला हवे होते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.