शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य रानडे, मलय महाजन राज्यात चौथे

By admin | Updated: June 29, 2017 02:49 IST

पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत पाटकर विद्यालयातील

लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंद्रकांत पाटकर विद्यालयातील इयत्ता पाचवीतील मलय महाजन व आठवीतील आदित्य रानडे राज्यात चौथे आले आहेत. तर, सिस्टर निवेदिता शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी आकांक्षा केळकर ग्रामीण भागातून ठाणे जिल्ह्यात प्रथम आली. २६ फे बु्रवारीला ही परीक्षा झाली होती. विशेष म्हणजे यंदा प्रथमच सरकारने इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली आहे. यापूर्वी ही परीक्षा इयत्ता चौथी व सातवीत घेतली जात होती. या परीक्षेत मलयला ९४.६३ टक्के, आदित्यला ९३.८७ टक्के आणि आकांक्षाला ८१.६३ टक्के गुण मिळाले आहेत.नांदिवलीला राहणाऱ्या मलयला सतत शिक्षकांचे प्रोत्साहन मिळते. तसेच त्यांची आवड यामुळे तो पाचवीत शिष्यवृत्ती परीक्षेला बसला होता. याशिवाय, वेगवेगळ्या परीक्षा मलय नेहमी देतो. यापूर्वी त्याने प्रज्ञा प्रावीण्य शोध परीक्षा, करकरे स्पर्धा, आयटीएम परीक्षा दिल्या आहेत. या परीक्षेतूनही त्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे. पण, सरकारकडून यंदा शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. राजाजी पथ येथे राहणाऱ्या आदित्यला शाळेच्या परीक्षेत नेहमी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळतात. यंदा तो नववीत असल्यामुळे होमी भाभा परीक्षा देणार आहे. यापूर्वी तो चौथीत असताना त्याने शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. त्या वेळी ३०० पैकी २८४ गुण मिळवत त्याने राज्यातून आठवा येण्याचा मान मिळवला होता. सरकारतर्फे त्याला दुसऱ्यांदा शिष्यवृत्ती मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला आहे. आदित्यला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.आकांक्षा ही सिस्टर निवेदिता शाळेत इंग्रजी माध्यमात शिक्षण घेत आहे. इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ही ती प्रथम आली होती. डोंबिवली शहर हे शहरी भागात येत असले तरी सिस्टर निवेदिता शाळा आजदे गावात असल्याने या शाळेला ग्रामीण भागात धरले जाते.