शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाअभावी अडले पुलाचे घोडे

By admin | Updated: July 3, 2016 03:10 IST

डोंबिवली-भिवंडी व ठाणेदरम्यानचे अंतर कमी व्हावे, यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीवर प्रस्तावित असलेला पूल भूसंपादनाअभावी रखडला आहे. भिवंडी तहसीलदार

- मुरलीधर भवार,  कल्याण

डोंबिवली-भिवंडी व ठाणेदरम्यानचे अंतर कमी व्हावे, यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीवर प्रस्तावित असलेला पूल भूसंपादनाअभावी रखडला आहे. भिवंडी तहसीलदार व केडीएमसीने भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडल्यास पुलाचे काम सुरू होऊ शकते. अन्यथा, ते दीर्घकाळ रखडण्याची दाट शक्यता आहे.
डोंबिवलीहून ठाण्याला जाण्यासाठी शीळ-मुंब्रा मार्गाने अथवा कल्याण-भिवंडी बायपासमार्गे जावे लागते. त्यामुळे वेळ व इंधनाचा अपव्यय होतो. ते टाळण्यासाठी मोठागाव ठाकुर्ली-माणकोली खाडीपुलास राज्य सरकारने मंजुरी दिली. या पुलासाठी २२६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. एमएमआरडीएनेही या कामासाठी निविदा काढून कंत्राटदार नेमला आहे. मात्र, पुलाचे काम सुरू झालेले नाही. खाडीवर ३३० मीटरचा पूल बांधण्यात येणार आहे. खाडीच्या पलीकडे अडीच किलोमीटरचा रस्ता, तर मोठागाव ठाकुर्लीच्या बाजूने ५६ मीटरचा पोहोच रस्ता पुलापर्यंत करण्यात येणार आहे. खाडीपलीकडे भिवंडी तहसील हद्दीत येणाऱ्या सुरई गावातील ग्रामस्थांनी खाडीपुलासाठी जमीन संपादनास विरोध दर्शवला आहे.
एमएमआरडीए व तहसील कार्यालयाचे अधिकारी सर्वेक्षणासाठी गेले असता ग्रामस्थांनी त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे भूसंपादनाच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. भिवंडी तहसील भागातील बाधितांच्या जागेचा बाजारभाव साडेतीन कोटी रुपये प्रतिएकरच्या घरात आहे. एमएमआरडीए त्यांना प्रतिहेक्टरला दोन कोटी देणार आहे. तो भावत्यांना मान्य नाही. तोटा सहन करून बाधित त्यांच्या जमिनी देण्यास तयार नाहीत.
डोंबिवली, मोठागाव परिसरातील जागाही संपादित करावी लागणार आहे. ती सीआरझेडमध्ये येत असून त्यातील प्रकल्पबाधितांना टीडीआर देता येत नाही. त्यांना टीडीआर द्यावा, असा ठराव महापालिकेने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला आहे. सीआरझेडच्या जागेतील टीडीआर देण्यासाठी परवानगी मिळावी, अशी विनंती राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. या सगळ्या प्रकारात एमएमआरडीए काही करू शकत नाही. जागा संपादित होत नाही, तोपर्यंत पुलाचे बांधकाम सुरू होऊ शकत नाही.

एमएमआरडीए आयुक्तांना साकडे
जमीन संपादन प्रक्रियेतील अडथळे दूर करण्यासाठी राज्य सरकार व एमएमआरडीएने सकारात्मक पावले उचलावीत, अशी मागणी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे व दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. जागा संपादनासाठी एमएमआरडीएने केडीएमसी व भिवंडी तहसीलदारांकडे तगादा लावला पाहिजे. तेव्हाच, भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती मिळून पुलाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी याविषयी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.