म्हारळ : २७ गावांतून नामनिर्देशन अर्ज आणण्यास गेलेल्या इच्छुक उमेदवारास संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कोळे येथील नेताजी पाटील हे निवडणुकीचा अर्ज आणण्याकरिता सावित्रीबाई फुले नाट्यगृहात गेले असता त्यांना संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी धमकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संघर्ष समितीने २७ गावांमधून अर्ज कोणीही न भरण्याचे आवाहन केले असून अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत जागता पहाराही सुरू ठेवला आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}