शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणांवर कारवाई! भाजपा नगरसेवकाची अधिकाऱ्यांना शिवीगाळ; CRZ मधील बांधकामे तोडण्यापासून रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 07:02 IST

अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कारवाई बंद पाडली. नगरसेवकच विरोध करत असल्याने पालिकेचे पथक तिकडून निघून गेले.

मीरा रोड - भाईंदर येथील सरकारी जागा आणि सीआरझेड क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामावर शुक्रवारी कारवाईसाठी गेलेल्या मीरा-भाईंदर महापालिकेच्या पथकाला नगरसेवकासह अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचा विरोध सहन करावा लागला. भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनीच कारवाई थांबवून पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ, दमदाटी केली. 

भाईंदर पश्चिमच्या जय अंबेनगर येथे शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी अनधिकृत बांधकामावर कारवाईसाठी महापालिका प्रभाग अधिकारी लॉरेटा घाडगे, कनिष्ठ अभियंता संदीप साळवे, फेरीवाला पथक प्रमुख मयूर भोईर यांच्यासह पालिका कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान गेले होते. सरकारी जागा आणि सीआरझेडमध्ये अनधिकृत बांधकामे असल्याने येथील दोन वाढीव मजल्याची बांधकामे सुरू असताना ती पाडण्यास गेलेल्या पालिका पथकाला अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह स्थानिक भाजप नगरसेवक अशोक तिवारी यांनी विरोध केला आणि कारवाई बंद करायला लावली.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कारवाई बंद पाडली. नगरसेवकच विरोध करत असल्याने पालिकेचे पथक तिकडून निघून गेले. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच भाजप आणि तिवारी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. याप्रकरणी नगरसेवक अशोक तिवारी यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी सत्यकाम फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा गुप्ता व अन्य यांनी केली आहे. 

आपल्याच नगरसेवकावर कारवाई करणार का?विशेष म्हणजे ११ फेब्रुवारीला महापौर दालनाचा पदभार स्वीकारताच महापौर डिम्पल मेहता यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून नवीन अनधिकृत बांधकाम खपवून घेणार नाही, असे सांगत जबाबदार अधिकारी-कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी चालवली होती. आता मात्र खुद्द त्यांच्याच नगरसेवकाने अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखल्याने आता महापौर स्वतःच्या नगरसेवकावर कारवाई करणार का, याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Action Against Encroachments Halted; BJP Corporator Abuses Officials, Blocks Demolition

Web Summary : Mira-Bhayandar: A BJP corporator halted demolition of illegal CRZ constructions, abusing officials. An inquiry is demanded after the incident went viral. The mayor had pledged action against illegal construction.
टॅग्स :BJPभाजपाMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक