मोक्कातील आरोपीला अटक

By Admin | Updated: October 16, 2016 03:31 IST2016-10-16T03:31:18+5:302016-10-16T03:31:18+5:30

पोलिसांना आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा मोक्कातील आरोपी आफताब अंजुम पटेल (२६) याला वसई गावातील स्नूकर पार्लरबाहेर नालासोपारा पोलिसांनी अटक केली.

The accused arrested in Mokkas | मोक्कातील आरोपीला अटक

मोक्कातील आरोपीला अटक

मीरा रोड : पोलिसांना आठ महिन्यांपासून गुंगारा देणारा मोक्कातील आरोपी आफताब अंजुम पटेल (२६) याला वसई गावातील स्नूकर पार्लरबाहेर नालासोपारा पोलिसांनी अटक केली. काशिमीरा येथील पटेल टोळीतील आफताब असून त्याचा साथीदार साजिद शाह (२६) यालाही बेड्या ठोकल्या.
पटेल टोळीवर विविध पोलीस ठाण्यात दोनशेहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. याच टोळीने फेब्रुवारी २०१६ मध्ये काशिगावात राहणाऱ्या पेशनवाज खान (२७) याच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणात आफताबसह त्याचे वडील अंजुम पटेल (४७), भाऊ अमन (१९), चुलतभाऊ हाशीर पटेल (१९) सह दानिश कुरेशी, साजिद यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून हे आरोपी पसार झाले होते. पोलिसांनी यांच्यावर मोक्का लावत त्यांना फरार घोषित करून संपत्ती जप्त केली होती. आफताब गुरुवारी वसईतील स्नूकर पार्लरमध्ये आल्याची माहिती काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांना मिळाली. त्यांनी लागलीच पथकासह गेले व आफताब, साजिदला अटक केली. दोघांकडून २० हजार जप्त केले.

साहिल खानच्या गाडीचोरीत सहभाग
आफताबने अभिनेता साहिल खान याची मर्सिडीज खरेदी करतो, असे सांगून ती ९ आॅक्टोबर २०१५ मध्ये पळवली होती. याप्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात आफताब, साजिद आरोपी आहेत. दोन महिन्यांनी ती गाडी परत केली. परंतु, आतील सर्व महागडे भाग काढून घेतले होते.

Web Title: The accused arrested in Mokkas