भिवंडी : लग्नपत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 18:03 IST2017-11-18T18:03:22+5:302017-11-18T18:03:36+5:30
भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा घरी परतताना अपघाती मृत्यू झाला.

भिवंडी : लग्नपत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा अपघाती मृत्यू
भिवंडी- भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यास गेलेल्या भावांचा घरी परतताना अपघाती मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (18 नोव्हेंबर) रोजी बोरपाडा गावाच्या हद्दीत घडली. शाहरूख रजाक शेख(२५) व बाबा मेहबूब शेख(१८) अशी मृतांची नावं आहेत.
हे दोघं बाईकवरुन त्यांच्या भावाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी तालुक्यातील म्हापोली येथे गेले होते. संध्याकाळच्या सुमारास घरी परतत असताना बोरपाडा गावाच्या हद्दीत भिवंडीकडून वाडा मार्गाकडे भरधाव जाणा-या डम्परने त्यांच्या बाईकला धडक दिली. या दुर्घटनेत दोघांना गंभीर दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात मकबुल खान गुलाम मोहम्मद शेख यांनी डम्पर चालकाविरोधात तक्रार दिली आहे. मात्र शुक्रवारपासून पळून गेलेल्या आरोपीस अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही.