रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार

By जितेंद्र कालेकर | Published: March 25, 2024 09:38 PM2024-03-25T21:38:30+5:302024-03-25T21:38:52+5:30

त्रिकुटास अटक : वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

A young man is stabbed with a sword on suspicion of being seen in anger | रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार

रागाने पाहिल्याच्या संशयातून तरुणावर तलवारीने वार

ठाणे : केवळ रागाने पाहिल्याच्या संशयातून सक्षम ब्रिजेशसिंग उर्फ डॉन (१९, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) याच्यासह तिघांनी कुणाल हाप्पन (२८, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याच्यावर तलवारीने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तिघांनाही अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी दिली. तिघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

वागळे इस्टेट राजीव गांधीनगर भागातील दत्त मंदिराजवळ २४ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास कुणाल याने रागाने पाहिल्याच्या संशयातून तसेच पूर्ववैमनस्यातून सक्षम उर्फ डॉन याने तलवारीने त्याच्या हातावर वार केले. त्याचवेळी साईनाथ गवळी (२१, रा.वायरमनवाडी, ठाणे) आणि सोनू उर्फ बाबू भोला शर्मा (२५, रा. अंबिकानगर, वागळे इस्टेट, ठाणे) यांनीही त्याला मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कुणाल याला रुग्णालयात दाखल केले आहे. सक्षम याच्यासह तिघांनाही पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार माने यांच्या पथकाने सोमवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे.

Web Title: A young man is stabbed with a sword on suspicion of being seen in anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.