शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट म्हणजे फक्त कवच नाही… ते एखाद्या कुटुंबाचे जगणे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

By सुरेश लोखंडे | Updated: November 20, 2025 20:59 IST

हेल्मेट घाला, कारण कुणीतरी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतं.

- सुरेश लोखंडे

ठाणे : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज एक वेगळाच, हृदयाला भिडणारा उपक्रम संध्याकाळी उशिरापर्यंत पार पडला. रस्ते अपघातांमध्ये अकाली विझणार्या तरुणांच्या जीवनदीपाबद्दल बोलताना ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा आवाजही दुःखाने भरला.“प्रत्येक अपघातात फक्त एक जीव जात नाही… तर, एक घर उद्ध्वस्त होतं, आई-वडिलांचं विश्व कोसळतं. म्हणूनच हेल्मेटचा वापर ही जबाबदारी नसून प्रेमाची शपथ आहे,'असे त्यांनी भावूक शब्दांत त्यांनी उपस्थितांना हेल्मेटचे महत्त्व आज संध्याकाळी पटवून दिले.

 येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 'रस्ता सुरक्षा ' हेल्मेटचे महत्त्व पटवून देणारा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांच्या खास उपस्थिती त पार पडला. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ‘हेल्मेट मॅन ऑफ इंडिया’ म्हणून देशभरात ओळखले जाणारे राघवेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत लहान विद्यार्थ्यांना हेल्मेट वाटप करण्यात आले आणि संपूर्ण सभागृहात एकच संदेश घुमला 'एक हेल्मेट, एक जीव वाचवतो.' लहान मुलांच्या डोक्यावर हेल्मेट चढताच सभागृहात एक वेगळीच ऊब निर्माण झाली. इतक्या लहान वयात त्यांना सुरक्षिततेची सवय लावण्याची कल्पना राघवेंद्र कुमार यांनी मांडली आणि उपस्थित पालकांच्या डोळ्यांतही आपुलकीची जाणीव दाटून आली.          'आजची ही पिढी जागरूक झाली, तर उद्या कुठलीही आई आपल्या मुलासाठी रडणार नाही,' असे कुमार म्हणाले. या कार्यक्रमात झालेला शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्यावरील एकपात्री प्रयोग विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेमाची नवचेतना रुजवून गेला. शेवटी मान्यवरांचा सन्मान आणि आंतरराष्ट्रीय पदक विजेती शौर्या अंबुरेचा गौरव होताच वातावरण अभिमानाने भारून गेलं. आज ठाण्यातून दिलेला हा छोटासा संदेश कदाचित उद्याच्या अनेक कुटुंबांचे भविष्य वाचवेल — हेल्मेट घाला, कारण कुणीतरी तुमच्यावर जीवापाड प्रेम करतं. .....

English
हिंदी सारांश
Web Title : Helmet is a lifeline, saving families: Collector Dr. Shrikrishna Panchal

Web Summary : Collector Dr. Panchal emphasized helmets save lives and families at a road safety event. Highlighting the importance, helmets were distributed to children, promoting early safety habits. 'Helmet Man of India,' Raghavendra Kumar, inspired awareness, preventing future tragedies. A play honored Captain Vinayak Gore, instilling patriotism.
टॅग्स :thaneठाणे