"भटका कुत्रा चावला, ३० वर्षाच्या तरुणाने आयुष्य संपवलं; कारण...", कल्याणमध्ये हादरवून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:10 IST2026-02-24T10:06:50+5:302026-02-24T10:10:44+5:30

Young Man Ends Life after Dog Bite in Kalyan: कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात सहजीवन सोसायटी आहे. या सोसायटीत आयस हा तरुण राहत होता.

"A 30-year-old man ended his life after being bitten by a stray dog; because...", a shocking incident in Kalyan | "भटका कुत्रा चावला, ३० वर्षाच्या तरुणाने आयुष्य संपवलं; कारण...", कल्याणमध्ये हादरवून टाकणारी घटना

"भटका कुत्रा चावला, ३० वर्षाच्या तरुणाने आयुष्य संपवलं; कारण...", कल्याणमध्ये हादरवून टाकणारी घटना

कल्याण (ठाणे) : भटका कुत्रा चावल्याने मला रेबीज होईल या भीतीपोटी बँकेत एका मोठ्या पदावर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली. आयस विश्वनाथ आमीन असे या तरुणाचे नाव आहे.

कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात सहजीवन सोसायटी आहे. या सोसायटीत आयस हा तरुण राहत होता. काही दिवसांपूर्वी आयस याच्या पायाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता. आयसने रेबीजचे इंजेक्शन घेतले. मात्र, काही दिवसांपासून तो चिंतेत होता. 

मला रेबीज होईल, त्याची लक्षणे दिसू लागली आहे असे त्याला वाटत होते. या भीतीपोटी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीत आत्महत्येमागील कारण लिहिले आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी टिटवाळा परिसरात एका महिलेला भटका कुत्रा चावला होता. तिला मुंबईतील सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. 

प्रशासनाला आता तरी जाग येणार का ?

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरणही कंत्राटदाराकडून योग्य प्रकारे केले जात नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी प्रशासनाकडे वारंवार केली आहे. भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने एका तरुणाने भीतीपोटी आत्महत्या केली.

या घटनेनंतरही प्रशासनाला जाग येणार आहे की नाही असा सवाल कुलकर्णी यांनी विचारला आहे. घटनेची गंभीर दखल घेत, शिंदेसेनेचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी केडीएमसी मुख्यालयात धाव घेतली. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेतली.

कल्याण पूर्वेतील भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरणही करण्यात यावे. 

रेबीज आजाराविषयी नागरिकांच्या जनजागृतीकरिता शिबिराचे आयोजन करावे. रेबीज इंजेक्शनचा पुरेसा साठा पालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध करून द्यावा, या मागण्यांची पूर्तता केली नाही, तर आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

Web Title : रेबीज के डर से कल्याण में 30 वर्षीय युवक ने की आत्महत्या

Web Summary : कल्याण में एक 30 वर्षीय बैंकर ने कुत्ते के काटने के बाद रेबीज के डर से आत्महत्या कर ली। रेबीज के इंजेक्शन लेने के बावजूद, उसे विश्वास हो गया कि उसमें लक्षण विकसित हो रहे हैं, और उसने अपने डर को बताते हुए एक सुसाइड नोट छोड़ा। आवारा कुत्तों को नियंत्रित करने और रेबीज जागरूकता अभियान चलाने की मांग बढ़ रही है।

Web Title : Fear of rabies: 30-year-old commits suicide in Kalyan

Web Summary : A 30-year-old banker in Kalyan, fearing rabies after a dog bite, tragically ended his life. Despite receiving rabies injections, he became convinced he was developing symptoms and left a suicide note explaining his fear. Calls for stray dog control and rabies awareness campaigns are increasing.