शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईंतर्गत ९ हजार ८८ विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:27 IST

ठाणे : वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क ...

ठाणे : वंचित गटातील तसेच दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शाळेचे इ १ ली ते ८ वी पर्यंतचे शिक्षण विनाशुल्क मिळावे यासाठी शासनाकडून दरवर्षी या घटकातील बालकांसाठी २५ टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपातील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी लॉटरीची प्रक्रिया राज्यस्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे. या लॉटरीमध्ये ठाणे जिल्ह्यातील एकूण ९ हजार ८८ अर्जांची निवड झाली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया २०२१-२२ करिता ज्या बालकांची निवड झाली आहे. त्यांनी संबंधित शाळेत जाऊन ३० जून २०२१ पर्यंत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संतोष भोसले यांनी केले आहे.

निवड झालेल्या बालकांना शाळांमध्ये शिल्लक राहिलेल्या रिक्त जगानुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिनांक कळविला जाईल. परंतु पालकांनी फक्त एसएमएसवर अवलंबून राहू नये. आरटीईपोर्टलवर प्रवेशाची तारीख या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश घेण्याचा दिनांक पाहावा. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शाळेत प्रवेश घेण्यासाठी पालकांनी गर्दी करू नये. सर्व शासकीय नियमांचे पालन करून प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे. तसेच प्रवेश घेण्यासाठी जाताना बालकांना आपल्या बरोबर नेऊ नये. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी सध्या शाळेत जाऊ नये.