शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

८० बांधकाम परवाने अडचणीत?

By admin | Updated: September 1, 2016 02:52 IST

नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे

उल्हासनगर : नगररचनाकार संजीव करपे यांच्या बेपत्ता होण्यामुळे महापालिकेचा नगररचनाकार विभाग बांधकाम परवान्याबाबत वादात सापडला आहे. करपे यांनी दिलेले सुमारे ८० बांधकाम परवाने जुन्या की नवीन विकास आराखड्यानुसार दिले, याच्या चौकशीची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरुण आशाण यांनी केली आहे. त्यांनी आयुक्तांकडे सर्वच बांधकाम परवान्यांची चौकशी करावी, असे सुचवले आहे. यामुळे करपे यांनी दिलेले बांधकाम परवाने अडचणीत आले आहेत. दरम्यान, बेपत्ता झालेले नगररचनाकार करपे यांचा १२ दिवसांनंतरही थांगपत्ता लागलेला नाही. यापूर्वीचे नगररचनाकार जेलची हवा खाऊन आले असून तराणी यांना लाचलुचपत विभागाने अटक केली होती. तर, प्रल्हाद होगे- पाटील, किरण सोनावणे यांचे बांधकाम परवाने वादात सापडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी होत आहे. करपे यांनी दिलेल्या बांधकाम परवान्यांची चौकशी करण्याची मागणी आमदार ज्योती कलानी यांनी केल्यावर पालिका वर्तुळात खळबळ उडाली. बेपत्ता झालेले करपे मागील महिन्यात फक्त आठ दिवस पालिकेत आले होते. आठ दिवसांत ३९ बांधकाम परवाने मंजूर कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंत्राटी अधिकारी व खाजगी वास्तुविशारद यांच्या मदतीने करपे यांनी पालिकेबाहेरच बांधकाम परवाने मंजूर केले असून यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप होत आहे. यातील बहुतांश बांधकाम परवाने खोट्या सनदेवर, खुल्या जागेवर, आरक्षित भूखंडांवर व खोट्या कागदांवर झाल्याचा आरोप कलानी यांनी केला आहे.३९ पैकी जे परवाने नियमानुसार आहेत, त्यांना स्थगिती आदेशातून वगळण्याची मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केली आहे. तत्कालीन, नगररचनाकार अरुण गुडगुडे यांनी दिलेल्या ११० बांधकाम परवान्यांची चौकशी आठ वर्षांपासून सुरू असताना बिल्डरांनी यातील ९० टक्के बांधकामे पूर्ण करून विक्रीही सुरू केली आहे. (प्रतिनिधी)