सेंट्रल पार्कला ९ दिवसात ६५ हजार ५०६ पर्यटकांची भेट

By अजित मांडके | Published: February 19, 2024 04:39 PM2024-02-19T16:39:35+5:302024-02-19T16:40:11+5:30

मागील ९ दिवसात याच सेंट्रल पार्कला तब्बल ६५ हजार ५०६ पर्यटकांनी भेट देऊन या पसंतीची मोहर दिली आहे.

65 thousand 506 tourists visited Central Park in 9 days | सेंट्रल पार्कला ९ दिवसात ६५ हजार ५०६ पर्यटकांची भेट

सेंट्रल पार्कला ९ दिवसात ६५ हजार ५०६ पर्यटकांची भेट

ठाणे : कुठे बच्चे कंपनीचा खेळण्या बागडण्याचा आवाज, कुठे जुन्या नव्या गाण्यांची समुदर मैफल, तर कुठे तलावांची काठी मन प्रसन्न करणारे पर्यटक, तर कुठे सेल्फी घेत फोटो काढणारे तरुण मंडळी हे, हे चित्र आहे, ठाणे महापालिकेच्या कोलशेत ढोकाळी भागातील सेंट्रल पार्कमधील. मागील ९ दिवसात याच सेंट्रल पार्कला तब्बल ६५ हजार ५०६ पर्यटकांनी भेट देऊन या पसंतीची मोहर दिली आहे. त्यामुळे भविष्यात ठाण्याच्या शिरपेचात हेच सेंट्रल पार्क मानाचा तुरा रोवणार हे मात्र या निमित्ताने निश्चित मानले जात आहे.

ठाणे महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कोलशेत परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर उभारलेले नमो द ग्रँड सेंट्रल पार्क  हे उद्यान ठाणे शहरासाठीच नव्हे तर, मुंबई महानगरातील शहरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे.

ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्पाच्या परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर नमो द ग्रँड सेंट्रल पार्क ची उभारणी करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्क (कन्स्ट्रक्शन टीडीआर) च्या माध्यमातून कल्पतरु विकासकाकडून हे उद्यान विकसित करून घेतले आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारची ३५०० फुल-फळ झाडे असून या वनराईतून मोठ्याप्रमाणात आॅक्सीजनची निर्मिती होणार आहे.

या उद्यानात पक्षी आणि फुलपाखरांच्या १०० पेक्षा जास्त प्रजाती आढळून येत आहेत. या उद्यानाचे उद्घाटन मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाल्यानंतर ९ फेब्रुवारी पासून हे उद्यान नागरिकांसाठी खुले झाले. ठाणे शहरासाठीच नव्हे तर, मुंबई महानगरातील हे सर्वात मोठे उद्यान असून यामुळे मुंबई महानगरातील नागरिकांसाठी हे उद्यान आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू लागले आहे.
नमो द ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते रात्री ९ यावेळेत उद्यान खुले ठेवण्यात येत आहे. लोकापर्ण कार्यक्रमाच्या दुसºया दिवसापासून म्हणजेच शुक्रवारपासून उद्यानाबाहेर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

उद्यानाच्या लोकापणार्नंतरच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सुट्टीचा दिवस नसतानाही अडीच हजाराहून अधिक पर्यटकांनी उद्यानाला भेटी दिल्या. तर दिवसेंदिवस हा आकडा वाढतांना दिसत आहे. शनिवार आणि रविवारी याठिकाणी पर्यटकांची मोठ्या संख्येने हजेरी लागलेली दिसून येत आहे. तर लहान बच्चेकंपनी घसरगुंडी, पासून इतर सर्व खेळ प्रकारांचा मनमुराद आनंद घेत आहेत. तसेच याठिकाणी भिजण्याची व्यवस्था असल्याने बच्चे कंपनी त्याठिकाणी देखील आपली हौस भागवितांना दिसत आहेत. तर रात्रीच्या सुमारास येथील विद्युत रोषणाई येथे येणाºया पर्यटकांना एक वेगळाच अनुभव देऊन जात आहे. त्यातही येथे चायनीज गार्डन, जापनीस गार्डन, दोन आर्टीफीशीअल तलावांच्या समोर कोणालाही फोटो काढण्याचा मोह आवरत नसल्याचेच दिसून येत आहे. त्यातही अनेकांनी सोशल मिडियावर याचे व्हिडीओ टाकल्याने ठाण्यासह इतर भागांतून देखील पर्यटक आता ठाण्याकडे वळू लागल्याचे चित्र आहे.

उद्यान प्रवेश शुल्क

ठाणे महापालिकेकडून या उद्यानात १५ वषार्खालील मुलांना विनामुल्य प्रवेश देण्यात येत आहे. तर, प्रौढांकडून २० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. तर, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रौढांकडून ३० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून प्रतिदिवस १० रुपये शुल्क घेण्यात येत आहे. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी येणाºया नागरिकांकरिता मासिक पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

न्यूयार्कच्या ग्रँड सेंट्रल पार्क, लंडनच्या हाईड पार्क आणि शिकागोच्या लिन्कॉलीन उद्यानाच्या संकल्पनेवर आधारीत सेंट्रल पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे. यामुळे शहरात एक सुंदर पर्यावरणस्नेही जंगलच उभे राहिले आहे. काश्मीरचे मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. पूवीर्ची झाडे, वृक्ष यांना धक्का न बसवता त्यांचाही वापर पार्कमध्ये करून हे उदयान फुलवण्यात आले आहे. मुलांसाठी खेळायला भरपूर जागा, जेष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. एक मोठे ओपन एम्पीथिएटर येथे आहे. पार्कमध्ये कॅफेटेरीया, शौचालयाची सोय करण्यात आली आहे.

Web Title: 65 thousand 506 tourists visited Central Park in 9 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे