शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

शाई धरणासाठी पालिकेची ५० कोटींची तरतूद?

By admin | Updated: March 24, 2017 01:13 IST

मागील कित्येक वर्षे कागदावर असलेल्या शाई धरणाच्या उभारणीकरिता आता ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाणे : मागील कित्येक वर्षे कागदावर असलेल्या शाई धरणाच्या उभारणीकरिता आता ठाणे महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, यंदाच्या अर्थसंकल्पात या धरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. भविष्यात ठाणेकरांची तहान भागावी, या उद्देशाने महापालिकेने मोठ्या प्रयत्नानंतर शाई धरणाचा प्रकल्प खेचून आणून त्याला मंजुरी मिळवली होती. २००७ मध्ये या धरणाला मुहूर्त सापडून जलसंपदा विभागाला शाई धरणासाठीचे सर्वेक्षण आणि खर्चाचा आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार, याचा सर्व्हेदेखील पूर्ण झाला आणि धरणासाठी ४५० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला. पालिकेने जरी या धरणाची परवानगी खेचून आणली असली तरीदेखील महासभेत लोकप्रतिनिधींनी दाखवलेल्या अनास्थेमुळे हे धरण उभारण्याची महापालिकेची क्षमता नसल्याचे कारण पुढे केले गेले. धरणाचे काम एमएमआरडीएने करावे व त्यातून मिळणारे पाणी ठाण्याबरोबरच इतर महापालिकांना द्यावे, असे सांगण्यात आले होते. त्यावेळीच शाई धरण कागदावर राहणार, हे स्पष्ट झाले. एमएमआरडीएने या धरणाचे काम करण्यात अनास्था दाखवली आणि पालिकेच्या आशा निराशेत परावर्तित झाल्या. सत्ताधाऱ्यांनी त्याच वेळेस सतर्कता दाखवली असती, तर आज ठाणेकरांना हक्काचे धरण मिळाले असतेच, शिवाय २०४६ पर्यंत ठाणेकरांची तहान भागू शकली असती. मागील वर्षी पाणीसंकट ओढवले आणि पुन्हा शाई धरणाचा मुद्दा चर्चेत आला. परंतु, पाऊस चांगला झाल्याने पुन्हा धरणाचा मुद्दा बासनात गुंडाळला गेला. (प्रतिनिधी)