शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

मनसेच्या अविनाश जाधवसह ५ जणांना अटक, कायदा हातात घेतल्याने कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2017 8:50 PM

 ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कायदा हातात घेऊन कारवाईचा बडगा उगारणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. याप्रकरणी आणखी सहा ते सात जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एल्फिस्टन रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा नाहक बळी ...

 ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कायदा हातात घेऊन कारवाईचा बडगा उगारणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणेनगर पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. याप्रकरणी आणखी सहा ते सात जणांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.एल्फिस्टन रेल्वे स्थानकामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवाशांचा नाहक बळी गेल्यानंतर मनसेने मुंबईत राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चा काढून फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची रेल्वे प्रशासनाला ताकीद दिली होती. या कारवाईसाठी त्यांनी १५ दिवसांची मुदत देऊन मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशाराही दिला होता. ही मुदत संपताच ठाणे आणि कल्याण परिसरात मनसेने आंदोलन केले. ठाण्यात शहरप्रमुख जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी फेरीवाल्यांना पिटाळण्यासाठी १० ते १२ फेरीवाले तसेच हातगाडीवरून विक्री करणाºयांच्या सामानाची तोडफोड केली. याप्रकरणी ठाणेनगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते. सॅटीस ब्रिजवरील विक्रेत्यांचे बाकडे तोडून त्याचे नुकसान करणे तसेच रिक्षाचालकांना हुसकावून लावल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनीच २१ आॅक्टोबर रोजी फिर्याद दाखल केली होती. तर सॅटीस पुलाच्या खाली ट्रॅफिक चौकीच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांचे सामान फेकून, नुकसान करणे तसेच त्यांना दमदाटी आणि मारहाण करणे, रिक्षा चालकांना दमदाटी केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यातही पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद दाखल केली होती. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्या पथकाने अविनाश जाधव, महेश कदम, रविंद्र मोरे, रवींद्र सोनार आणि संदीप साळुंखे या पाच जणांना सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. यातील आणखी सहा ते सात जणांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती नौपाडा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अभय सायगावकर यांनी दिली. नौपाडा पोलिसही फेरीवाल्यांच्या गुन्ह्यात याच आरोपींना ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणेArrestअटक