शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

477 कोटींच्या प्रारुप विकास आराखड्यास मंजुरी, ठाणे जिल्हा वार्षिक योजनेची पार पडली ऑनलाइन बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 08:43 IST

नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्येक्षतेखाली ही जिल्हा वार्षिक योजनेची ऑनलाइन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली.

ठाणे : २०२१-२२ या कोरोनानंतरच्या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ४७७ कोटींच्या प्रारुप विकास आराखड्यास शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाइन बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये सर्वसाधारण क्षेत्राच्या ३३२ कोटी ९५ लाखांसह आदिवासी उपयोजनेचे ७१ कोटी १२ लाख आणि समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेच्या ७२ कोटी ७२ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याचा समावेश आहे.

नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्येक्षतेखाली ही जिल्हा वार्षिक योजनेची ऑनलाइन बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात पार पडली. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी ४७७ कोटीच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देताना, जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी राज्यस्तरीय बैठकीमध्ये करणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. कोरोनामुळे या आर्थिक वर्षात महसूलवाढीचा वेग मंदावला आहे. तरीही ग्रामीण भागातील सर्वांगिण विकासासह रस्ते, पाणी, वीज तसेच अन्य प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. विकास आराखड्यास अनुसरून त्यांनी सदस्यांची मते जाणून घेत सर्वानुमते मंजुरी दिली.३९६ कोटींच्या खर्चाला मंजुरी, पालकमंत्र्यांनी घेतला खर्चाचा आढावा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक प्रथमच ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना तसेच विशेष घटक योजनेच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. २०२० -२१ मधील ३९६ कोटी रुपयांच्या आराखड्यातील डिसेंबरअखेर झालेल्या खर्चाचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आणि पुनर्विनियोजनाच्या प्रस्तावास मान्यताही दिली. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या. विविध विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार संबंधित विभागांनी या मागण्यांची दखल घ्यावी आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बैठकीचे प्रास्तविक केले. 

टॅग्स :thaneठाणेEknath Shindeएकनाथ शिंदे