342 patients found in Thane district today; Three people died | ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

ठाणे जिल्ह्यात आज सापडले ३४२ रुग्ण; तीन जणांचा मृत्यू

ठाणे - जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाचे ३४२ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५३ हजार ७० रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १४३ झाली आहे.  

 
ठाणे शहरात ७४ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५८ हजार ७३० झाली आहे. शहरात मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३५८ झाली. कल्याण - डोंबिवलीत ९६ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू आहे. आता ५९ हजार ९१३ रुग्ण बाधीत असून एक हजार १६६ मृत्यूची नोंंद आहे. 

उल्हासनगरमध्ये सात रुग्ण सापडले असून एक मृत्यू आहे. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६०३ झाली. तर, ३६७ मृतांची नोंद झाली आहे. भिवंडीला दोन बाधीत आढळून आले असून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ६९५ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये २७ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात  बाधितांची संख्या २६ हजार २५८ असून मृतांची संख्या ७९५ आहे.

अंबरनाथमध्ये पाच रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ  हजार ५३६ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये दहा रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ३०० झाले आहेत. या शहरातही मृत्यू न झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२२ कायम आहे. ग्रामीणमध्ये ३३ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. तर बाधीत १९ हजार १७७ झाले असून  आतापर्यंत ५८६ मृत्यू नोंदले आहेत.

Web Title: 342 patients found in Thane district today; Three people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.