शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

३१ बिल्डरांच्या कामाच्या ठिकाणांची ‘झाडाझडती’; इतर बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:22 IST

पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी पालिकेमार्फत उपाययोजना केल्याचा परिणाम काही अंशी दिसून आला आहे. ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारली आहे; परंतु ३९ पैकी ज्या ३१ बांधकाम व्यावसायिकांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचे दावे केले आहेत त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून झाडाझडती घेण्याचा निर्णय पालिकेने घेतला. उर्वरित बांधकाम व्यावसायिकांना १५ दिवसांची मुदत दिल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

हवा प्रदूषण नियंत्रणासाठी असलेल्या नियमावलीचे पालन करण्याबाबत २९७ बांधकामांना प्राथमिक नोटिसा पाठवण्यात आल्या. त्यापैकी, ३१ जणांनी सर्व नियमावलीचे पालन केल्याचा दावा पालिकेने केला. १५१ जणांकडे काही त्रुटी आढळल्याने त्यांना सुमारे चार लाख रुपयांचा दंड आकारून अटींची पूर्तता करण्यास बजावण्यात आले. ३९ जणांनी नियमावलीची पूर्तता न केल्याने त्यांना बांधकाम का थांबवू नये, अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

त्यासाठी त्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली; परंतु त्यानंतरही अंमलबजावणी झाली नाही तर मात्र त्यांचे बांधकाम थांबविण्याचा इशारा पालिकेने दिला. या पाहणीत त्रुटी आढळल्या तर अशा बांधकाम व्यावसायिकांना दंड आकारला जाणार आहे.

हवा प्रदूषणात घट

मागील डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठाण्यातील हवा प्रदूषणात वाढ झाली होती. त्यामुळे महापालिकेने यावर उपाययोजना हाती घेतल्या होत्या. त्याचा परिणाम आता काही प्रमाणात का होईना दिसून आला आहे. घोडबंदर भागातील हवा प्रदूषणाची पातळी ही सरासरी ११४ पर्यंत म्हणजेच मध्यम प्रदूषित गटात मोडली आहे, तर उपवन येथील हवा प्रदूषणाची पातळी १०२ च्या आसपास आहे. 

मेट्रो आणि सेवा रस्त्यांच्या कामांमुळे त्रास

घोडबंदर भागात मागील कित्येक वर्षांपासून मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे या भागात सायंकाळी सहानंतर वाहतूककोंडी होते. तसेच या भागात आता सेवा रस्त्यांची खोदाई सुरू आहे. त्यामुळे याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. नाकावर रुमाल बांधूनच सायंकाळच्या सुमारास येथील रहिवाशांना प्रवास करावा लागतो. तसेच या भागातच मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यावसायिकांची कामे सुरू आहेत. त्यामुळे येथील धूळ आणि हवा प्रदूषणात फारशी घट झाल्याचे चित्र दिसत नाही.

टॅग्स :businessव्यवसायThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाpollutionप्रदूषण