आरोग्य खात्यात ३० टक्के पदे रिक्त

By Admin | Updated: January 8, 2015 01:16 IST2015-01-08T01:16:57+5:302015-01-08T01:16:57+5:30

सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टरांसह तीस टक्के पदे रिक्त असून भरतीसाठी १५ जानेवारीपासून ‘वॉक इन इंटरव्ह्णू’ घेतले जातील,

30% vacancies in Health Department empty | आरोग्य खात्यात ३० टक्के पदे रिक्त

आरोग्य खात्यात ३० टक्के पदे रिक्त

मुंबई - सार्वजनिक आरोग्य विभागात डॉक्टरांसह तीस टक्के पदे रिक्त असून भरतीसाठी १५ जानेवारीपासून ‘वॉक इन इंटरव्ह्णू’ घेतले जातील, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी बुधवारी पत्रकारांना दिली.
वर्ग एक आणि दोन प्रवर्गातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती एमपीएससीमार्फत होत असली तरी अन्य पदे भरण्यासाठी प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळ आधीच स्थापन करण्यात आले आहे. त्याच्या माध्यमातून रिक्त पदे भरली जातील. (विशेष प्रतिनिधी)

मेळघाटातील रुग्णांची मुंबईतून तपासणी
च्शिवसेनेच्या वतीने टेलिमेडिसिनचा अनोखा प्रयोग पुढील आठवड्यात करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्णातील दुर्गम मेळघाट भागात असलेल्या सेमाडोह गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांची तपासणी मुंबईच्या स्टुडिओत बसलेले नामवंत डॉक्टर करतील. त्यासाठी व्हीसॅट यंत्रणेचा वापर केला जाईल.
रुजू होण्यासाठीचा अवधी कमी करणार
च्सरकारी डॉक्टर म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर रुजू होण्यासाठी एक महिन्याचा अवधी (जॉयनिंग पिरिएड) सध्या दिला जातो. बरेच जण या काळात रुजू होत नाहीत आणि मग पुन्हा भरती होईपर्यंत कालापव्यय होतो. म्हणून आता रुजू होण्याचा कालावधी जास्तीत जास्त आठ ते पंधरा दिवसांचा करण्यात येईल, असे डॉ.सावंत यांनी सांगितले. तसेच, डॉक्टरांना सध्या २५ लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचा बाँड लिहून द्यावा लागतो. बाँडची रक्कम वाढविण्याचा विचार असल्याचे डॉ.सावंत म्हणाले.

Web Title: 30% vacancies in Health Department empty