अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 09:04 IST2025-06-06T09:02:08+5:302025-06-06T09:04:31+5:30

एक कार नाल्यातील झाडाझुडपात पडलेल्या अवस्थेत आढळून आली

3 bodies found in an accident-hit car; The incident was revealed by a woman grazing cattle | अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार

अपघातग्रस्त गाडीत आढळले ३ मृतदेह; गुरे चारणाऱ्या महिलेमुळे उघडकीस आला प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क, कसारा: शहापूर तालुक्यातील उंबरमाळी येथे एका अपघातग्रस्त कारमध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. गुरुवारी दुपारी गुरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेला दुर्गंधी आली. ती कारजवळ गेली असता ही घटना उघडकीस आली. हा अपघात चार ते पाच दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर एक कार नाल्यातील झाडाझुडपात पडलेल्या अवस्थेत आढळून आली. गुरे चरायला सोडली असताना महिलेचे त्या  कारकडे लक्ष गेले. तिने उंबरमाळीतील ग्रामस्थांना बोलावले. आपत्ती व्यवस्थापन टीम व कसारा पोलिसांना याची माहिती दिली. कसारा पोलिस ठाण्याचे प्रभारी सुरेश गावित, पोलिस उपनिरीक्षक सागर जाधव, पोलिस कर्मचारी उमेश चौधरी यांनी क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढून तिची तपासणी केली असता यात तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. ही कार मुंबईतील असून, कारमध्ये यज्ञेश वाघेलासह अन्य दोघांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाली. या तिन्ही मृतदेहांचे अंदाजे वय २५ ते ३० असल्याचे समजते. 

Web Title: 3 bodies found in an accident-hit car; The incident was revealed by a woman grazing cattle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.