शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावे वगळली, तर न्यायालयात

By admin | Updated: March 21, 2017 01:56 IST

संघर्ष समितीच्या नेत्यांच्या दबावाखातर जर २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळली, तर न्यायालयात दाद मागू

कल्याण : संघर्ष समितीच्या नेत्यांच्या दबावाखातर जर २७ गावे कल्याण-डोंबिवली महापालिकेतून वगळली, तर न्यायालयात दाद मागू असा इशारा देत शिवसेनेने ही गावे वगळण्याचा आपला विरोध तीव्र केला आहे. या गावातील नागरिकांना पालिकेतून बाहेर पडायचे नाही. पण नेत्यांनी या गावांत अनधिकृत बांधकामे केली आहेत. ती नियमित करण्यासाठीच या नेत्यांना स्वतंत्र नगरपालिका हवी आहे, असा आरोपही शिवसेना नगरसेविका आशालता बाबर यांनी केला आहे. या गावातील बेकायदा बांधकामांना आमचा पाठिंबा नाही, असे संघर्ष समितीतर्फे स्पष्ट केले जात असले, तरी ही बांधकामे वाचवण्याचे काम समितीकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समितीला स्वतंत्र नगरपालिका का हवी आहे, याचे स्पष्टीकरण देताना बाबर म्हणाल्या, २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन झाल्यावर बेकायदा बांधकामे सरकारकडून नियमित केली जातील. त्यासाठीच त्यांना गावे वेगळी करून हवी आहेत. या गावातील नागरिकांना स्वतंत्र नगरपालिका नको आहे. त्यांना वेगळे व्हायचे नाही. त्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेतच राहायचे आहे. ही फक्त नेत्यांची गरज आहे. राज्य सरकारला गावे वेगळी करायची होती, तर ती त्यांनी महापालिकेत समाविष्टच का केली. आत्ता पुन्हा वेगळी करुन काय साध्य होणार आहे. राज्य सरकारने संघर्ष समितीच्या दबावाला बळी पडून गावे वेगळी करण्याचे राजकारण केले, तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा बाबर यांनी दिला. (प्रतिनिधी)निवडणुकीतील पाठिंबा संघर्ष समितीच्या मूळावर : कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुका होऊन भाजप, शिवसेना, मनसे, अपक्ष आणि बसपाचे २१ नगरसेवक निवडून आले. या गावातील नागरिकांना निवडणुकीची प्रक्रियाच मान्य नसती, तर त्यांनी मतदान करुन नगरसेवक निवडून दिले नसते. बहिष्कार टाकला असता. पण असे झाले नाही. २७ गावातून शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले. मनसेचा एक, बसपाचा एक आणि भाजपाचे ११ नगरसेवक निवडून आले. निवडणुकीत सर्वपक्षीय संघर्ष समितीने भाजपाला पाठिंबा दिला होता. संघर्ष समिती आधी बहिष्कार टाकणार होती. त्यानंतर ती भाजपच्या वळचणीला गेली. त्यांची ही कृतीच त्यांच्या मूळावर आली आहे. निवडणुका पार पडल्यानंतर त्यांनी पुन्हा गावे वगळण्याची मागणी केली. नगरसेवकांनी प्रभागात महापालिकेच्या निधीतून विकासकामे सुरु केली आहेत. या गावातील बेकायदा बांधकामांचा मुद्दा भाजप नगरसेविका रविना माळी यांनी उपस्थित केला, तर गावातील पाणी बेकायदा बांधकामांसाठी वापरले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करुनपालिका मुख्यालयावर हंडा- कळशी मोर्चा काढला होता.