शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांना आता २७ हजारांचा अतिरिक्त लाभ!

By admin | Updated: October 12, 2015 05:18 IST

राज्यातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यासाठीच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या ९५ हजार रुपयांच्या खर्चात आता २७ हजारांची नव्याने वाढ होऊन

सुरेश लोखंडे , ठाणेराज्यातील बेघर कुटुंबांना इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यासाठीच्या बांधकामासाठी मिळणाऱ्या ९५ हजार रुपयांच्या खर्चात आता २७ हजारांची नव्याने वाढ होऊन लाभार्थ्याच्या बँक खात्यावर एक लाख २२ हजार जमा होणार आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार नवीन लाभार्थ्यांना या वाढीव रकमेचा लाभ होणार आहे.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे गावखेड्यांतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना या इंदिरा आवास योजनेच्या घरकुलांचा लाभ मिळत आहे. या योजनेद्वारे लाभार्थ्यांना २०१३-१४ या आर्थिक वर्षापर्यंत ९५ हजार रुपये मिळत होते, पण त्यात नव्याने २७ हजारांची अतिरिक्त वाढ केल्याचे नवीन परिपत्रक राज्य शासनाने २०१४-१५ या वर्षापासून लागू केले आहे. या कालावधीतील मंजूर घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना एक लाख २२ हजार मिळणार असल्याच्या वृत्तास जिल्हा प्रकल्प अधिकारी आर.के. बामणे यांनी दुजोरा दिला आहे. घरकुल बांधण्यासाठी मिळणाऱ्या ९५ हजार रुपयांच्या तरतुदीमध्ये निर्मल भारत अभियानाद्वारे १२ हजार रुपये मिळणार आहेत. त्यातून लाभार्थ्याने घरात किंवा बाहेर वैयक्तिक शौचालय बांधायचे आहे. याशिवाय, घरकुल बांधण्यासाठी राबणाऱ्या लाभार्थ्याला मनरेगाद्वारे सुमारे १५ हजार मिळणार आहेत. इंदिरा आवास, निर्मल भारत आणि मनरेगा या तिन्ही योजना मिळून एक लाख २२ हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. राज्यात अतिरिक्त लाभासाठी राज्य शासनाने एक वर्ष आधीच (२०१३-१४) परिपत्रक जारी केले होते, पण त्यात असंख्य त्रुटी असल्यामुळे त्याचा लाभ मिळाला नव्हता. त्यात दुरुस्ती करून नव्याने काढलेल्या या परिपत्रकानुसार अतिरिक्त रकमेच्या लाभाचा मार्ग मोकळा झाला आहे. या रकमेचा अपहार होऊ नये, यासाठी लाभार्थ्याच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे.