शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकासाठी २५ कोटींचे अनुदान

By admin | Updated: March 21, 2017 01:45 IST

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आझादनगर या आरक्षित भूखंडावरील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ५० कोटींचा

भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या आझादनगर या आरक्षित भूखंडावरील प्रस्तावित बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने किमान २५ कोटींचे अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिल्याने निधी उपलब्ध होण्याची शक्यता सरनाईक यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आणि त्यांच्या जीवनावर आधारित माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात यावे, यासाठी आ. सरनाईक अनेक वर्षापासून पालिकेकडे पाठपुरावा करीत होते. हे स्मारक मंजूर होऊन शहर विकास योजनेतील आझादनगर येथील सामाजिक वनीकरण व उद्यानासाठी आरक्षित भूखंडावर साकारण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली होती. या जागेच्या ४६ हजार ७०० चौरस मीटरपैकी ३० हजार ५३३ चौरस मीटर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. या जागेपैकी १५ टक्के म्हणजेच ४ हजार ५८० चौरस मीटर जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व त्यांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय प्रस्तावित आहे. नियोजित स्मारकामध्ये बाळासाहेबांचा जीवनप्रवास, फोटो संग्रहालय, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांनी काढलेली व्यंगचित्रे, त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या चित्रफिती आदी माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. उर्वरित जागेवर अ‍ॅम्पी थिएटर व प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून थीम पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. सुमारे ५० कोटींहून अधिक खर्चाच्या या स्मारकाचे सादरीकरण काही दिवसांपूर्वीच आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्याकडे करण्यात आले होते. त्याला आयुक्तांनी मान्यता दिल्यानंतर त्याच्या कार्यवाहीला सुरुवात करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. मात्र, स्मारकासाठी आवश्यक निधी पालिकेच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यासाठी सरकारी अनुदान उपलब्ध करून देण्याची ग्वाही सरनाईक यांनी आयुक्तांना दिली. यानुसार, पालिकेकडून दोन टप्प्यांत २५ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. उर्वरित २५ कोटींच्या निधीसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)