शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

१ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सव, गावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 16:12 IST

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील गावदेवी मैदानात आंबा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात आंबा आणि आंब्याच्या पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे १ मे पासून ठाण्यात आंबा महोत्सवगावदेवी मैदानात ५५ स्टॉल्स मांडणार  १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार

ठाणे : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत संस्कार व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित आंबा महोत्सव गावदेवी मैदान येथे १ मेपासून सुरू होत आहे. यंदाचे या महोत्सवाचे १३ वे वर्ष आहे अशी माहिती संस्कारचे अध्यक्ष आ. संजय केळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.    १० मे पर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे. १ मे रोजी सायं. ४.३० वा. या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. कोकणातील बागायतदारांचे सेंद्रीय पद्धतीचे आंबे या महोत्सवात असणार आहे. आंबे व आंब्यांचे इतर पदार्थांचे ५५ स्टॉल्स मांडण्यात येणार आहे. यात कृषी विद्यापीठाचा वेगळा स्टॉल देखील असणार आहे. कोकणताली आंबा उत्पादक शेतकरी वेळोवेळी अडचणीत असतो. परंतू हा शेतकरी सर्व संकटावर मात करुन आंब्याची शेती करतो, या वर्षी ४० टक्के आंब्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती आ. केळकर यांनी दिली. या महोत्सवात २ व ३ मे रोजी मृणाल कुलकर्णी आणि निमिर्ती सावंत भेट देणार आहेत. कोकणातील १ लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड होते. २०१५ साली ३ लाख २० हजार मेट्रीक टन, २०१६ साली २ लाख ५६ हजार मेट्रीक टन तर २०१७ साली १ लाख २८ हजार मेट्रीक टन उत्पन्न झाले अशी खंत व्यक्त करत आंबा उत्पादन घटतंय याला हवामानातील बदल कारणीभूत असल्याचे ते म्हणाले. गेल्यावर्षी या महोत्सवात एक कोटीच्यावर उलाढाल झाली होती. २०१६ ला हाच आकडा दीड कोटी होता असे आ. केळकर यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेMangoआंबाMarketबाजार