शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

ठाणे मॅरेथॉन स्पर्धा रंगणार १८ ऑगस्ट रोजी, बक्षिसांच्या रकमेत सव्वा लाखांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 11:45 PM

ठामपा आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा तिसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे.

ठाणे : ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा यंदा १८ आॅगस्ट रोजी आयोजिण्यात येणार आहे. ठाण्यातील मॅरेथॉनच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच पुरुष आणि महिलांची मुख्य स्पर्धा २१ किलोमीटरची होणार असून बक्षिसांच्या रकमेचा आकडा सव्वाआठ लाखांवर गेला आहे. आगामी विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून ठाणे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी शिवसेनेच्या काही बड्या नेतेमंडळींना बोलवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.ठामपा आणि ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा तिसावी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन होत आहे. ही मॅरेथॉन स्पर्धा राज्यपातळीवरील असल्यामुळे राज्यातून साधारणपणे १५ ते २० हजार खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. धावपटूंच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी तसेच ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून देश व जागतिक पातळीवर धावपटू निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. गेली अनेक वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा संपूर्ण राज्याच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. मान्सून सुरू झाल्यावर ठाणेकर नागरिकांना या स्पर्धेची प्रतीक्षा असते. त्यानुसार, यंदा ही स्पर्धा १८ आॅगस्ट रोजी आयोजित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याकरिता, महापालिका मोठ्या प्रमाणात तयारीला लागली आहे. याकरिता विविध विभागांच्या बैठका सुरू आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत या मॅरेथॉन स्पर्धेवर सत्ताधारी शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.विधानसभा निवडणुकांच्या पाशर््वभूमीवर यंदा मोठ्या उत्साहात स्पर्धांचे आयोजन करण्याचा सत्ताधाऱ्यांचा मानस आहे. शिवसेनापक्षप्रमुखांसह युवासेना नेते या स्पर्धेसाठी येण्याची शक्यता आहे. यासाठी पालिकेतर्फे ४० लाख, तर प्रायोजकांद्वारे ३० लाख असे एकूण ७० लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.गतवर्षी या स्पर्धेमध्ये सात लाखांची बक्षिसे वाटण्यात आली होती. यंदा त्यात सव्वा लाखांनी वाढ केली आहे. यंदा पहिल्यांदाच महिलांची मुख्य स्पर्धा ही १५ किलोमीटरवरून २१ किलोमीटर करण्यात येणार असल्याने, दोन्ही मुख्य स्पर्धा २१ किलोमीटरच्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Marathonमॅरेथॉन