आरटीई प्रवेशासाठी १५ हजार ४३० अर्ज, ३१ मेपर्यंत मुदत; ठाणे जिल्ह्यातील ६४२ शाळांत ११ हजार ३७७ जागा

By अजित मांडके | Updated: May 29, 2024 15:20 IST2024-05-29T15:19:41+5:302024-05-29T15:20:05+5:30

प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मेपर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे.

15 thousand 430 applications for RTE admission, deadline till May 31; 11 thousand 377 seats in 642 schools of Thane district | आरटीई प्रवेशासाठी १५ हजार ४३० अर्ज, ३१ मेपर्यंत मुदत; ठाणे जिल्ह्यातील ६४२ शाळांत ११ हजार ३७७ जागा

आरटीई प्रवेशासाठी १५ हजार ४३० अर्ज, ३१ मेपर्यंत मुदत; ठाणे जिल्ह्यातील ६४२ शाळांत ११ हजार ३७७ जागा

ठाणे :  आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने दिनांक १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात २९ मेपर्यंत ११ हजार ३७७ जागासाठी १५ हजार ४३० अर्ज प्राप्त झाले आहेत. २०२४-२५ या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

     प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मेपर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. ३१ मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. 

      २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

    तरी पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी व पालकांनी आरटीई पोर्टलवर सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
 

Web Title: 15 thousand 430 applications for RTE admission, deadline till May 31; 11 thousand 377 seats in 642 schools of Thane district