शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन दलाने वाचवले १३ वर्षांच्या मुलाचे प्राण

By admin | Updated: July 3, 2016 03:07 IST

इमारतीच्या लोखंडी प्रवेशद्वारावर खेळताना पाय घसरून प्रवेशद्वाराची लोखंडी टोकदार सळई मनगटात घुसून अडकलेल्या १३ वर्षांच्या मुलाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली.

मीरा रोड : इमारतीच्या लोखंडी प्रवेशद्वारावर खेळताना पाय घसरून प्रवेशद्वाराची लोखंडी टोकदार सळई मनगटात घुसून अडकलेल्या १३ वर्षांच्या मुलाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली. एका बाजूने सळई कापून त्यांनी मुलाची दरवाजातून सुटका केली. पण, सळईचा उर्वरित भाग मनगटातच रुतलेला असल्याने त्याला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अभिनव शाळेजवळ सुखसागर इमारत आहे. या इमारतीच्या लोखंडी प्रवेशद्वारावर विश्वास पुजारी (१३) खेळत होता. पाऊस जोरात असल्याने खेळताखेळता तो प्रवेशद्वाराच्या लोखंडी जाळीवरून घसरला आणि जाळीवरील भाल्यासारखी टोकदार सळई विश्वासच्या मनगटात घुसली. सळई आरपार गेल्याने रक्तबंबाळ होऊन विश्वास मदतीसाठी जीवाच्या आकांताने ओरडू लागला. लोक जमले, पण त्याचे सळईत अडकलेले मनगट काढणे अशक्य झाले.
पालिकेच्या मुख्य अग्निशमन केंद्रात मदतीसाठी कॉल येताच लीडिंग फायरमन संजय पाटील व अरुण शिर्के काही मिनिटांतच तेथे पोहोचले. मनगटात सळई आरपार गेलेल्या विश्वासचा आकांत पाहून अग्निशमन दलाच्या या दोन्ही जवानांनी क्षणाचीही उसंत न घेता सळई कापण्यास सुरुवात केली. सुमारे १५ मिनिटांच्या प्रयत्नांनी प्रवेशद्वारावरची सळई कापून काढण्यात आली. पण, सळईच्या टोकाकडचा भाग मात्र विश्वासच्या मनगटातून काढणे अशक्य असल्याने रुतलेल्या सळईच्या तुकड्यासह त्याला सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले.