शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
4
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
5
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
6
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
8
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
9
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
10
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
11
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
12
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
13
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
14
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
15
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
16
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
17
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
18
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
19
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
20
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर- वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षकांची अदला बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 15:52 IST

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांची नया नगर पोलीस ठाण्यातून वालीव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे.

मीरा रोड - मीरा भाईंदर - वसई विरार पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस निरीक्षक व २ साहेब पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये आयुक्तालय झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच हा फेरबदल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांची नया नगर पोलीस ठाण्यातून वालीव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर वालीव पोलीस ठाण्याचे प्रभारी विलास चौगुले यांची नियोजित पेल्हार पोलीस ठाण्यात नियुक्ती केली गेली आहे. नालासोपारा पोलीस ठाण्याचे प्रभारी वसंत लब्दे यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली असून लब्दे यांच्या जागी विरार वाहतूक शाखेचे विलास सुपे यांना नियुक्त केले आहे.

आर्थिक गुन्हे शाखेचे विजयसिंग बागल यांची मीरारोड पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली असून तेथे कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक  शैलेंद्र नगरकर यांची नियंत्रण कक्षात बदली केली आहे. प्रशासनात असलेले राजू माने यांना अर्नाळा पोलीस ठाणे प्रभारी नेमले आहे. अर्नाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शेट्ये यांना पोलीस प्रशासन शाखेत नियुक्त केले आहे.मध्यवर्ती गुन्हे पथकचे निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांची नियुक्ती नया नगर पोलिस ठाण्यात झाली आहे.  तर नालासोपारा पोलीस ठाण्यात निरीक्षक समीर अहिरराव यांना गुन्हे शाखेत नियुक्त केले आहे.

विरार पोलीस ठाण्यात निरीक्षक विवेक सोनवणे यांना सुरक्षा शाखेत नेमले आहे. तुळींज पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाराम वळवी याना विरार पोलीस ठाण्यात नेमले आहे. एसीबी मुंबई येथील निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांची नवघर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.  नवघरचे रोशन देवरे व तुळींज चे संदेश पलांडे या २ सहायक पोलीस निरीक्षक यांची गुन्हे शाखेत बदली झाली आहे.या बदल्या करताना पोलीस निरीक्षकांच्या एकूणच कामकाज आणि कार्यपद्धतीचा आढावा पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी विचारात घेतल्याचे सांगितले जाते. या अदला बादलीत काही जण नाराज तर  काहीजण खुश झाले आहेत. 

टॅग्स :Policeपोलिसthaneठाणे