शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात होणार १२५ कोटींचे रस्ते

By admin | Updated: February 24, 2016 03:06 IST

एकीकडे ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि

ठाणे : एकीकडे ठाणे शहराची वाढती लोकसंख्या, वाढती वाहनसंख्या आणि त्यातून होणारी वाहतुक कोंडी फोडण्यासाठी विकास आराखड्यातील नियोजनाप्रमाणे काही रस्त्यांचे रुंदीकरण आणि नुतनीकरण केले जाणार आहे. भविष्यातील वाहतुकीचा विचार करुन येत्या आर्थिक वर्षात १२.१९ किमीच्या १६ रस्त्यांचे रुंदीकरण करुन नुतनीकरण केले जाणार आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात १२५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे.सध्या ठाण्याची लोकसंख्या २० लाखांच्यावर असून वाहनांची संख्या १५ लाखांच्या आसपास आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. दरवर्षी वाहनांच्या संख्येत आठ ते १० टक्क्यांची भर पडते. परंतु अपुऱ्या-अरूंद रस्त्यांमुळे कोंडी वाढताना दिसते. ती फोडण्यासाठी पालिकेने रस्त्याचे रुंदीकरण आणि नुतनीकरण करण्यावर भर देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी १२५ कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. यंदाच्या अथर्संकल्पात विकास आराखड्यातील ५.९ किमीचे दोन रस्ते विकसित करण्यासाठी ४० कोटींची तरतुद आहे. विकास आराखड्यातील २.२३ किमी लांबीच्या मिसिंग लिंक जोडण्यासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. युटीडब्ल्युटी व सिमेंट कॉंक्रीटीकरण पध्दतीने १६ किमीचे २१ रस्ते विकसित करण्याचे नियोजन आहे. युटीडब्ल्युटी रस्त्यासाठी ५० कोटी व सिमेंट कॉंक्रीटीकरणासाठी १२ कोटींची तरतुद करण्यात आली आहे. कन्स्ट्रक्शन टीडीआरचा वापर कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून ४० मीटर रुंदीच्या घोडबंदर रोडवरील वेदांत हॉस्पिटल ते विहंग व्हॅली कॉम्प्लेक्स रस्ता, ४० मीटर रुंदीचा भाईंदरपाडा येथील ट्रक टर्मिनस आरक्षण ते घोडबंदर रस्ता, ३० मीटर रुंदीचा आनंदनगर खेळाचे मैदान आरक्षण ते घोडबंदर रस्ता, ३० मीटर रुंदीचा मार्केट आरक्षण क्र. २ पासून पोस्ट आॅफीस ते पार्कवुड कॉम्प्लेक्सचा रस्ता, ३० मीटर रुंदीचा होरायझन स्कुल ते विजय रेसिडेन्सीमार्गे राणी खन्ना स्कुल रस्ता, ४० मीटर रुंदीचा वाघबीळ रोड ते हिरानंदानी इस्टेट रस्ता, तुर्फेपाडा रस्ता आदींचा यात समावेश आहे. पालिका निधीतून होणारे रस्तेमहापालिकेच्या निधीतून २४ मीटर रुंदीचा शीळ-दिवा रस्ता, ३० मीटर रुंदीचा दिवा-आगासन देसाई खाडी रस्ता, ४० मीटर रुंदीचा ग्लॅडी अल्वारीस रोड, कोठारी गोडाऊन ते नीळकंठ वुड्स ते घोडबंदर रस्ता, आर. मॉल येथून मनोरमानगर ते कोलशेत रस्ता, बुधाजीनगर रस्ता आदींचा विकास होणार आहे. पालिका निधीतून रूंदीकरणपालिका निधीतून विकसित होणाऱ्या विकास आराखड्यातील रस्त्यांत पोखरण रोड नं. १ आणि २, कापुरबावडी नाका ते बाळकुम, कळवा नाका ते मनीषानगर, सुभाष पथ, शिवाजी पथ, महात्मा गांधी रोड, खोपट रोड, राघोबा शंकर पथ, एल. बी. एस. रोड आदी रस्त्यांचा समावेश आहे.