वाढदिवसा दिवशीच दहावीच्या विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 19:08 IST2021-04-02T19:08:01+5:302021-04-02T19:08:36+5:30
Death : रौनक सुरजपाल यादव ( वय १८ ) ही इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होती.

वाढदिवसा दिवशीच दहावीच्या विद्यार्थिनीचा अल्पशा आजाराने मृत्यू
भिवंडी - शहरातील धामणकर नाका अजंठा कंपाऊंड परिसरात राहणारे यादव समाजाचे राष्ट्रीय प्रवक्ता व पत्रकार सूरजपाल यादव यांच्या १८ वर्षीय रौनक यादव या मुलीचे अल्पशा आजाराने शुक्रवारी दुःखद निधन झाले आहे. आज तिचा वाढदिवस होता मात्र मुंबईतील रूग्णालयात उपचार घेत असतानाच तिचा मुत्यु झाल्याने यादव समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रौनक सुरजपाल यादव ( वय १८ ) ही इयत्ता १० मध्ये शिक्षण घेत होती. गेल्या काही दिवसापासून ती आजारी असल्याने तीला मुंबई येथील नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.सायंकाळी साडेसहा वाजता तिच्या वर गौरीपाडा येथील हिंदु शांती स्मशानभूमीत शोकाकुल वातावरण अंत्यसंस्कार करण्यात आले.