बदलापूर एमआयडीसीत एका मागोमाग १० स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 10:08 IST2026-01-08T10:07:49+5:302026-01-08T10:08:07+5:30
अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास आठ ते दहा स्फोट झाले.

बदलापूर एमआयडीसीत एका मागोमाग १० स्फोट
लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : बदलापूरच्या खरवई एमआयडीसीतील पॅसिफिक केमिकल कंपनीत बुधवारी सायंकाळी एकामागोमाग तब्बल १० स्फोट झाले. तीन किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण होते.
अर्ध्या ते पाऊण तासाच्या अंतरात जवळपास आठ ते दहा स्फोट झाले. या घटनेची माहिती समजताच बदलापूर अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या तत्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कंपनीचे प्रचंड नुकसान झाले.