शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

Wimbledon Tennis 2018 :  सेरेना, कर्बर, ओस्तापेंको उपांत्य फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 9:02 PM

अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली.

लंडन - अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. पुढील फेरीत दोन्ही खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळतील. विशेष म्हणजे ओस्तापेंको विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळवणारी लॅटव्हियाची पहिली खेळाडू ठरली.  सुपरमॉन सेरेना विल्यम्सने इटलीच्या कॅमिला जिऑर्जीवर 3-6, 6-3, 6-4 असा विजय मिळवला. 

चार वर्षांपूर्वी ज्यूनिअर विम्बल्डन पटकावलेल्या ओस्टापेंकोने यंदाच्या सत्रात दमदार खेळ करत सर्वांचे लक्ष वेधले. स्लोवाकियाच्या डॉमनिका सिबुलकोवाला सरळ दोन सेटमध्ये ७-५, ६-४ असा धक्का देत ओस्टापेंकोने विजयी आगेकूच केली. फ्रेंच ओपनची माजी विजेती असलेल्या ओस्टापेंकोने याआधी झालेल्या आपल्या पाचही सामन्यात एकही सेट गमावलेला नाही, हे विशेष. दरम्यान, स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी बलाढ्य कर्बरचा पुढील सामन्यात सामना करावा लागणार असल्याने आता, ओस्तापेंकोला आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. कर्बरने आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना रशियाच्या १४व्या मानांकीत डारिया कास्टाकिनाचे आव्हान ६-३, ७-५ असे संपुष्टात आणले. यासह कर्बरने तिस-यांदा विम्बल्डनच्या उपांत्य सामन्यात धडक मारली आहे.  २०१६ साली अंतिम सामन्यात तिला सेरेना विलियम्सकडून पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे, सोमवारी रात्री उशिरापर्यंत खेळविण्यात आलेला सामना थांबविण्यात आल्यानंतर मंगळवारी अर्जेंटिनाच्या डेल पोत्रोने फ्रान्सच्या गाइल्स सिमॉनचे कडवे आव्हान चार सेटमध्ये परतावले. सिमॉनने कडवा प्रतिकार करताना डेल पोत्रोला विजयासाठी ४ तास २४ मिनिटांमपर्यंत झुंजवले. परंतु, अखेर डेल पोत्रोने ७-६(७-१), ७-६(७-५), ५-७, ७-६(७-५) असे नमविले. आता पुढच्या फेरीत डेल पोत्रोला जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू नदालविरुद्ध खेळायचे असून या दोघांमध्ये याआधी झालेल्या १५ सामन्यांमध्ये नदालने दहा, तर डेल पोत्रोने पाच सामने जिंकले आहेत.  

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडा