शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महाराष्ट्राच्या ॠतुजाचे आव्हान संपुष्टात, कडवी झुंज दिल्यानंतरही पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2017 20:52 IST

महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला.

मुंबई : महाराष्ट्राची युवा टेनिसपटू ॠतुजा भोसले हिला चांगली झुंज दिल्यानंतरही मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. इस्त्राईलच्या डेनिझ खाझानिउक हिने आक्रमक खेळ करताना एक तास १५ मिनिटांमध्ये ॠतुजाचा पराभव केला.चर्चगेट येथील क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत भारताच्या चार खेळाडूंना वाइल्ड कार्ड प्रवेश मिळाला होता. यापैकी पहिल्याच फेरीत पराभूत होणारी ॠतुजा तिसरी भारतीय ठरली. याआधी सोमवारी करमन कौर थंडी आणि झील देसाई यांचा पहिल्याच फेरीत पराभव झाला होता.ॠतुजा जागतिक क्रमवारीत ५७७व्या स्थानी आहे. परंतु, तरीही तीने जागतिक क्रमवारीत २७१व्या स्थानी असलेल्या डेनिझला चांगली झुंज दिली. सरळ दोन सेटमध्ये डेनिझ विजयी झाली असली, तरी तिला ऋतुजाविरुद्ध ६-४, ६-३ असे झुंजावे लागले. पहिल्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी साधत ॠतुजाने सामना चुरशीचा केला. मात्र, यानंतर अनुभवी डेनिझने वेगवान खेळ करताना ५-३ अशी आघाडी घेतली. ॠतुजानेही पुढील गेम जिंकत ४-५ अशी पिछाडी कमी करत सामन्यात रंगत भरले. पण दहाव्या गेममध्ये डेनिझने बाजी मारत पहिला सेट जिंकत १-० अशी आघाडी घेतली.दुसºया सेटमध्ये तुफान सुरुवात केलेल्या डेनिझने सलग चार गेम जिंकत ४-० अशी भक्कम आघाडी घेत आपला विजय निश्चित केला. परंतु, अखेरपर्यंत हार न मानणाºया ॠतुजाने पुन्हा एकदा भरारी घेत ३ गेम जिंकले. मोक्याच्यावेळी खेळ उंचावत डेनिझने सामना तिस-या सेटमध्ये जाणार नसल्याची खबरदारी घेत ६-३ अशी बाजी मारत दुस-या फेरीत प्रवेश केला.अन्य लढतीत दुसरे मानांकन लाभलेली रुमानियाची अ‍ॅना बोगदान हिने मेक्सिकोच्या व्हिक्टोरिया रॉड्रिग्ज हिचा ६-१, ६-१ असा फडशा पाडत दणदणीत विजयी सलामी दिली. तसेच, चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्सच्या अमानदीन हेसेने आॅस्टेÑलियाच्या अरेना रोडिओनोवाचे कडवे आव्हान ७-६(२), ६-३ असे परतावले. चीनच्या जिआ जिंग लु हिनेही स्पर्धेत विजयी सलामी देताना हंगेरीच्या दालमा गाल्फीचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला.

टॅग्स :Sportsक्रीडा