शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

डेव्हिस चषक टेनिस : भारत-पाकलढतीकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 4:26 AM

शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.

नूर सुल्तान (कजाखस्तान) : शुक्रवारपासून येथे प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस चषक लढतीत मजबूत भारतीय संघ कमकुवत पाकिस्तान संघाचे आव्हान लीलया पार करण्यात यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे. ही लढत नाट्यमय परिस्थितीमध्ये तटस्थ स्थळावर आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थळाबाबत अखेरच्या क्षणापर्यंत अनिश्चितता कायम होती. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये खेळाडूंच्या निवडीबाबत साशंकता होती.अखेर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) ही लढत नूर-सुल्तानमध्ये आयोजित करण्यात निर्णय घेतला. कारण आयटीएफच्या स्वतंत्र लवादाने पाकिस्तानटेनिस महासंघाचे अपील फेटाळले.सुमित नागल, रामकुमार रामनाथन व अनुभवी लिएंडर पेस यांच्यासारखे प्रतिभावान खेळाडूंच्या उपस्थितीत भारतीय संघ सहज विजय मिळवेल, अशी आशा आहे, पण पाकिस्तानचे अव्वल खेळाडू ऐसाम उल-हक कुरेशी आणि अकिल खान यांनी माघार घेतल्यामुळे लढत एकतर्फी होणार हेही नक्की. भारतीय खेळाडूंना ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अनुभव आहे, तर पाकिस्तानचे खेळाडू अद्याप आयटीएफ फ्यूचर्स पातळीच्या स्पर्धेत छाप सोडण्यासाठी संघर्ष करीत आहेत. पण, जोपर्यंत पाकिस्तानचे आघाडीचे खेळाडू खेळत होते तोपर्यंत दुहेरीमध्ये प्रतिस्पर्धा होती, पण लढतीचे स्थळ बदलण्याच्या विरोधात त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही प्रतिस्पर्धाही संपली.पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्युनिअर खेळाडूंना या लढतीच्या निमित्ताने शिकण्याची संधी मिळेल. या लढतीतील विजेता संघ मार्च महिन्यात क्रोएशियामध्ये होणाºया २०२० च्या विश्व ग्रुप क्वालिफायरसाठी पात्र ठरेल. ४६ वर्षीय पेसला सर्वाधिक दुहेरी सामने जिंकण्याच्या आपला डेव्हिस चषकमधील विक्रमामध्ये सुधारणा करण्याची संधी आहे. तो ४३ विजयांसह अव्वल स्थानी आहे. हा विक्रम त्याने गेल्या वर्षी चीनविरुद्ध खेळताना नोंदवला होता.१८ ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावणारा पेस डेव्हिस चषकामध्ये पदार्पण करणाºया जीवन नेदुनचेझियानच्या साथीने खेळणार आहे. जीवन डेव्हिस चषक खेळणारा भारताचा ७५ वा खेळाडू असेल. फॉर्मात असलेल्या नागलकडे पहिला डेव्हिस चषक विजय नोंदवण्याची संधी आहे. कारण त्याने स्पेन (२०१६) व चीन (२०१८) यांच्याविरुद्ध एकेरीच्या दोन्ही लढती गमाविल्या होत्या. रामकुमार दुस-या क्रमांकाचा एकेरीचा खेळाडू म्हणून खेळेल. तो जय-पराजयाची आकडेवारी सुधारण्याचा प्रयत्न करेल. (वृत्तसंस्था)पाकिस्तानला सहज नमवू - कर्णधाररामकुमार शुक्रवारी मोहम्मद शोएबविरुद्धच्या लढतीने सुरुवात करेल. शोएबला आयटीएफ फ्यूचर्स स्पर्धेच्या मुख्य ड्रॉमध्ये अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. एकेरीच्या दुसºया लढतीत नागलचा सामना हुजाएफा अब्दुल रहमानसोबत होईल. त्याने ज्युनिअर आयटीएफ सर्किटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताचा कर्णधार रोहित राजपाल म्हणाला की, ‘पाकला व्हॉईटवॉश देण्याची आशा आहे. त्यांच्या संघात युवा खेळाडूंचा समावेश असून ते मजबूत भारतीय संघाविरुद्ध खेळतील. त्यांच्याकडे गमाविण्यासारखे काही नाही. ते झुंजार असून अखेरपर्यंत लढतील, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याचे मला कळले आहे. आम्ही सफाया करण्याचा प्रयत्न करू.’शून्य अंशापेक्षा कमी तापमान असल्यामुळे लढत इंडोर हार्डकोर्टवर खेळली जाणार आहे. शनिवारी लढतीच्या दुसºया दिवशी पेस व जीवन यांची लढत शोएब व हुजाएफा यांच्यासोबत होईल. भारताने ३-०अशी विजयी आघाडी घेतली, तरी चौथी लढत खेळली जाईल. संघांकडे पाचवी लढत न खेळण्याचा पर्याय आहे. लढत भारतीय वेळेनुसार शुक्रवारी दुपारी १.३० वाजता आणि शनिवारी११.३० वाजता सुरू होईल.

टॅग्स :TennisटेनिसIndiaभारतPakistanपाकिस्तान