ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सर्बियन दिग्गज टेनिस स्टार नोवाक जोकोविचने इटालियन यानिक सिन्नर विरुद्धच्या थरारक आणि रंगतदार सामन्यात पराभूत केले आहे. या विजयासह जोकोनं कारकिर्दीतील ११ व्या ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये धडक मारली आहे. दहावेळचा ऑस्ट्रेलियन ओपन विजेता असलेल्या जोकोविचने दोनदा सेटमध्ये पिछाडीवर पडूनही दमदार पुनरागमन करत गत विजेत्या सिन्नरला ३-६, ६-३, ४-६, ६-४, ६-४ असे पराभूत केले. आता फायनलमध्ये जोकोविचची गाठ जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या कार्लोस अल्काराझशी पडणार आहे. त्याने पहिल्या सेमीफायनलमध्ये दुखापतीशी झुंज देत अलेक्झांडर झ्वेरेव्हवर पाच सेट्सच्या थरारक लढतीत विजय मिळवला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लढवय्या जोकोविच! सिन्नरविरुद्धच्या पराभवाची मालिका केली खंडीत
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिन्नरन पहिला आणि तिसरा सेट जिंकत सामना आपल्या बाजूने वळवला होता. मात्र चौथ्या क्रमांकावरील जोकोविचने अनुभव, संयम आणि जिद्द दाखवत पुन्हा पुन्हा कमबॅक केले. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळानंतर सिनरविरुद्ध मिळवलेला हा जोकोविचचा पहिला विजय ठरला.
Australian Open : "उह-आया…" आवाजावर आक्षेप! पंचांच्या निर्णयामुळे सेमीफायनलमध्ये हायहोल्टेज ड्रामा
दोघांच्यातील लढत एकदम जबरदस्त झाली, शेवटी जोकोनं बाजी मारली
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सिन्नरने पहिला सेट ६-३ जिंकत दमदार सुरुवात केली. पण दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचनं स्कोअर लाइन उलटी फिरवली. हा सेट ६-३ असा आपल्या नावे करत दिग्गज सर्बियन टेनिसपटूनं परफेक्ट रिप्लाय देत सामन्यात बरोबरीचा डाव साधला. तिसऱ्या सेटमध्ये इटालियन टेनिसपटूनं पुन्हा धमक दाखवली अन् ६-४ अशी बाजी मारली. जोकोविचनं यावेळीही पुन्हा पटलवार करत सेम टू सेम रिप्लाय देत ६-४ असा सेट आपल्या नावे करत सामना पाचव्या सेटमध्ये नेला. या सेटमध्येही दोघांच्या रंगतदार खेळ पाहायला मिळाला. अखेर जोकोविचनं हा सेट ६-४ असा जिंकत फायनलमध्ये एन्ट्री मारली.
२०२३ च्या विम्बल्डन स्पर्धेतनंतर जोकोला मिळालं यश
मागील दोन वर्षांहून अधिक काळापासून जोकोविच हा सिन्नर विरुद्ध विजय मिळवण्यात अपयशी ठरताना पाहायला मिळाले होते. २०२३ च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जोकोनं सिनरला ६-३, ६-४, ७-६(४) अशी मात दिली होती. त्यानंतर प्रत्येक वेळी इटालियन युवा टेनिस स्टार अनुभवी जोकोला चॅलेंज देताना दिसले. २०२४ च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील सेमीत सिन्नरनं ६-१, ६-२, ६-७(६), ६-३ अशा फरकाने जोकोविचला पराभवाचा दणका दिला. गत कॅलेंडर ईयरमध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेच्या सेमीफायनलमध्येही या दोघांच्या सामना रंगल्याचे पाहायला मिळाले इथंही सिन्नरनं ६-४, ७-५, ७-६(३) अशी बाजी मारली होती. पण अखेर त्याचे चक्रव्यूव्ह भेदत जोकोविचनं फायनलच तिकी मिळवले आहे.
Web Summary : Novak Djokovic defeated Jannik Sinner in a five-set Australian Open semi-final, securing a spot against Alcaraz in the final after a hard fought victory.
Web Summary : नोवाक जोकोविच ने पांच सेटों के सेमीफाइनल में यानिक सिनर को हराकर ऑस्ट्रेलियन ओपन के फाइनल में जगह बनाई, अब अल्काराज से मुकाबला होगा।