Xiaomi ने केले iPhone वरून ट्विट, बिल-मेलिंडा घटस्फोटाच्या आधारे केली जाहिरात, मग जे झाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:05 PM2021-05-12T14:05:57+5:302021-05-12T14:06:58+5:30

Xiaomi posts awkward tweet on Bill Gates’ divorce: चिनी कंपन्या कोणत्या थराला जातील याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. चीनची कंपनी शाओमीने त्यांच्या Mi 11चा प्रचार करण्यासाठी नुकताच बिल गेट्स यांनी जाहीर केलेल्या मेलिंडा गेट्स सोबतच्या घटस्फोटाचा आधार घेतला आहे.

Xiaomi tweeted from iPhone, Mi 11 advertised based on Bill-Melinda divorce, then what happened ... | Xiaomi ने केले iPhone वरून ट्विट, बिल-मेलिंडा घटस्फोटाच्या आधारे केली जाहिरात, मग जे झाले...

Xiaomi ने केले iPhone वरून ट्विट, बिल-मेलिंडा घटस्फोटाच्या आधारे केली जाहिरात, मग जे झाले...

googlenewsNext

चीनची स्मार्टफोन कंपनी Xiaomi सध्या एका ट्विटवरून खूपच ट्रोल झाली आहे. कंपनीने एका स्मार्टफोनच्या जाहिरातीसाठी ट्विटरवर एक ट्विट केले. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी जे उदाहरण दिले आणि जी भाषा वापरली ती पाहून नेटकऱ्यांचे टाळकेच हलले. त्याहून धक्का देणारी बाब म्हणजे स्वत:चे एवढे ढीगभर फोन असताना अॅपलच्या आयफोनवरून ट्विट केल्याने शाओमीची पुरती धुलाई झाली आहे. (Xiaomi posts awkward tweet on Bill Gates’ divorce, was posted using an iPhone)

Bill Gates divorce: 27 वर्षे साथ दिली, आता शक्य नाही! अब्जाधीश बिल गेट्स, मेलिंडाकडून घटस्फोटाची घोषणा


चिनी कंपन्या कोणत्या थराला जातील याचे हे एक जिवंत उदाहरण आहे. चीनची कंपनी शाओमीने त्यांच्या Mi 11चा प्रचार करण्यासाठी नुकताच बिल गेट्स यांनी जाहीर केलेल्या मेलिंडा गेट्स सोबतच्या घटस्फोटाचा आधार घेतला आहे. या ट्विटमध्य़े शाओमीने म्हटले आहे की, 'अब्जाधीश पार्टनरसोबत ब्रेकअप करणे हा काही स्मार्ट चॉईस नाहीय. आमचा Xiaomi Mi 11 45 मिनिटांत 55W च्या वायर्ड टर्बो चार्जरने फुल चार्ज होतो. म्हणजेच तुम्ही नेहमी सोडण्यासाठी तयार राहणार आहात.' 

ती सध्या काय करते! अब्जाधीश जेफ बेजोस यांच्या घटस्फोटीत पत्नीने केले एका शिक्षकासोबत लग्न


एवढेच नाही तर या ट्विटमध्ये Mi 11 चा जो फोटो वापरला आहे त्यावर एक मेसेज लिहिलेला आहे, 'We need to talk'. या मेसेजचा रिसिपिअंट कोण आहे माहितीये? हा मेसेज Melinda अशा नावाला पाठविल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच या मेसेजच्या खाली ट्विटरवर पोस्ट केल्यानंतर कोणत्या ऑपरेटिंग सिस्टिमवरून पोस्ट केली हे दिसते. यामध्ये Tweeted from iPhone असे आहे. याचाच अर्थ शाओमीने ट्विट करण्यासाठी आयफोन वापरला आहे. 


आता ही गोष्ट नेटकऱ्यांना खटकली नाही तर नवल. iPhone वरून ट्विट केल्याचे दिसताच लोकांनी शाओमीची खेचायला सुरुवात केली. युकेच्या ट्विटर हँडलवर हे ट्विट करण्यात आले होते. जर Mi 11 एवढा चांगला फोन आहे तर कंपनी स्वत:चे ट्विटर वापरण्यासाठी iPhone का वापरतेय असा सवाल करायला सुरुवात झाली. कंपनीने अखेर वैतागून हे ट्विट डिलीट केले. तरी देखील य़ा ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विटर आणि दुसऱ्या सोशल मीडिया साईटवर कमालीचा व्हायरल होऊ लागला आहे. 
 

Web Title: Xiaomi tweeted from iPhone, Mi 11 advertised based on Bill-Melinda divorce, then what happened ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.