Xiaomi hit hard by government; bans browser offered on its phones | Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

नवी दिल्ली : चिनी कंपन्यांवर केंद्र सरकारने करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली असून अनेक अॅपवर बंदी आणली आहे. आज सरकारने देशातील सर्वात मोठी बनलेली चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमीला चांगलाच दणका दिला आहे. शाओमी त्यांच्या स्मार्टफोनमध्ये देत असलेला इनबिल्ट ब्राऊझर बॅन करण्यात आला आहे.


'Mi Browser Pro - Video Download, Free Fast & Secure' विरोधात ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. हा ब्राऊझर मोबाईलच्या परफॉर्मन्सवर वाईट पद्धतीने परिणाम करत असल्याचे समोर आले आहे. यावर कंपनीने सरकारसोबत बोलणी सुरु केली आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा ब्राऊझर मोबाईलवर परिणाम करत नसल्याचा दावा केला असून युजर अन्य कंपन्यांचे ब्राऊझर डाऊनलोड करू शकतात असेही म्हटले आहे. 


सरकारने आणखी एक चिनी अॅप QQ International ब्लॉक केले आहे. शाओमीविरोधातील कारवाईमुळे युजरना फटका बसणार नाहीय. युजर त्यांच्या स्मार्टफोनद्वारे इंटरनेट वापरू शकणार आहेत. शाओमीने भारतात 10 कोटी स्मार्टफोन विकले आहेत. शाओमी ही भारतातील सर्वाधिक खपाची कंपनी बनलेली आहे. 
 

शाओमीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केंद्र सरकारच्या मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे सांगितले. युजरचा डेटा स्थानिक पातळीवरच ठेवला जात असल्याचे ते म्हणाले. भारतीय कायद्यानुसार आम्ही युजरची सुरक्षा जपत आहोत, असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. 
चीनसोबतच्या वादानंतर भारताने चिनी अॅपना दणका देण्यास सुरुवात केली होती. 29 जूनला सरकारने 59 चिनी अॅपवर बंदी आणली होती. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझर, Helo, Likee, Shareit, Mi Community, WeChat सारखे अॅप होते. यानंतर पुन्हा 27 जुलैला 47 अॅप बॅन केले होते. 
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

Web Title: Xiaomi hit hard by government; bans browser offered on its phones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.