Father sold the house for education; struggling story of Pradip Singh who became an IAS | पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहाणी

युपीएससी परीक्षा 2019 चा निकाल आज जाहीर झाला. यामध्ये प्रदीप सिंह याने ऑल इंडिया रँक वन मिळविली आहे. मात्र, याच यादीमध्ये 26 व्या नंबरवर आणखी एक प्रदीप सिंह नाव आहे. हे प्रदीप सिंह आयआरएस अधिकारी म्हणून आपली सेवा देत आहेत. मात्र, त्यांची संघर्ष कहानी खूप वेगळी आहे. आई वडिलांच्या शिरपेचात या प्रदीप सिंहने मानाचा तुरा खोवला आहे. 


या प्रदीप सिंहांनी CSE 2018 मध्ये ऑल इंडिया रँक मिळविली होती. 22 वर्षे वय असताना पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ही परिक्षा पास केली होती. यानंतर एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितले होते की, मी जेवढा संघर्ष केला त्यापेक्षा अधिक संघर्ष माझ्या आई-वडिलांनी केला आहे. 
प्रदीप सिंह यांचे वडील एका पेट्रोल पंपावर काम करतात. प्रदीप यांचे स्वप्न मोठे होते. अशातच त्यांनी  दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. ते 2017 मध्ये दिल्लीला आले होते. याचठिकाणी त्यांनी कोचिंग क्लास लावला. दिल्लीला येण्याचा खर्च काही कमी नव्हता. यामुळे आर्थिक संकट मोठे होते. मात्र, आई-वडिलांनी यावर मात केली. अभ्यासाआड हे संकट येऊ न देता त्यांनी घर विकले. 


प्रदीप यांच्या वडिलांनी ANI ला सांगितले की, मी इंदौरला एका पेट्रोल पंपावर काम करतो. मी मुलांना नेहमीच चांगले शिक्षण देऊ इच्छित होतो. कारण ते भविष्यात चांगले काहीतरी करू शकतील. प्रदीपने सांगितले की त्याला युपीएससी परिक्षा द्यायची आहे. माझ्य़ाकडे तेवढे पैसे नव्हते. मात्र, मुलाच्या शिक्षणासाठी मी घर विकले, त्या काळात मला आणि कुटुंबाला मोठ्या हालअपेष्टा सहन करव्या लागल्या. मात्र, आज मी खूप खूश आहे. 


क्लासची फी 1.54 लाख
प्रदीप य़ांच्या कोचिंग क्लासची फी दीड लाख रुपये होती. तसेच इतर खर्च होताच. इंदौरचे घरच आमची एकमेव मालमत्ता होती. वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता ते घर विकले. मला याची कल्पना नव्हती पण जेव्हा माझ्या शिक्षणासाठी घर विकल्याचे समजले तेव्हा माझाही आत्मविश्वास वाढला. तसेच मनोमन तयारी करत युपीएससीची परिक्षा कोणत्याही परिस्थितीत पास करायचीच असा निश्चय केल्याचे प्रदीप सिंह यांनी सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

UPSC IAS, IPS परीक्षेचा निकाल जाहीर; प्रदीप सिंह देशभरात टॉपर

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Father sold the house for education; struggling story of Pradip Singh who became an IAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.