Put politics aside, ask Uddhav Thackeray! Kangana fired questions at Aditya Thackeray | राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

बॉलिवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या आरोपांची मालिका आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर येऊन ठेपली आहे. यावर आदित्य ठाकरेंनी गलिच्छ राजकारण होत असून मी संयम ठेवल्याचा इशारा दिला आहे. आता अभिनेत्री कंगना रानौतने थेट आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. 


कंगनाच्या डिजिटल टीमने पहिल्याच ट्विटमध्ये लिहिले आहे, ''हाहा, पहा गलिच्छ राजकारणावर कोण बोलत आहे. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची खूर्ची कशी मिळाली, हे देखिल गलिच्छ राजकारणावरील केस स्टडी आहे सर. हे सारे सोडा, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री वडिलांना सुशांतच्या मृत्यूविषयी हे प्रश्न विचारा. पहिला प्रश्न- रिया चक्रवर्ती कुठे आहे?''


दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूबाबत एफआयआर दाखल का नाही केला? तिसरा प्रश्न - जेव्हा सुशांतच्या जिवाला धोका असल्याची फेब्रुवारीतच एक तक्रार दाखल झालेली होती, मग मुंबई पोलिसांनी एका दिवसात सुशांतने आत्महत्या केल्याचे घोषित करण्याची घाई का केली? असे प्रश्न विचारले आहेत. 


तिसऱ्या ट्विटमध्ये कंगनाच्या टीमने चौथा प्रश्न विचारला आहे. आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा सुशांतच्या मोबाईलची माहिती का नाहीय? ज्याद्वारे मृत्यूच्या एक आठवडा आधी सुशांतने कोणाकोणाला फोन केले होते? कोणाकोणाशी बोलला होता? पाचवा प्रश्न- बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर लॉक करून का ठेवले आहे? सहावा प्रश्न- अखेर तुम्ही सीबीआय चौकशीला का घाबरत आहात? आणि सातवा प्रश्न रिय़ा आणि तिच्या कुटुंबाने सुशांतचे पैसे का लुटले?, असे प्रश्न विचारले आहेत. यानंतर कंगनाच्या टीमने आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावताना या प्रश्नांचा राजकारणाशी काहीही संबंध नाहीय, यामुळे कृपया याचे उत्तर द्यावे, असे म्हटले आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

आजचे राशीभविष्य - 5 ऑगस्ट 2020; कर्क, सिंह राशींसाठी आज क्लेशाचा दिवस, सांभाळा

दोन दिवसांपूर्वीच कोरोनावर मात; माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुण्यात निधन

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचा मुलगा IAS बनला; वाचा प्रदीप सिंह यांची संघर्षमय कहानी

यंदा LIC चा आयपीओ मालामाल करणार; या कंपन्या करणार शेअर बाजारात एन्ट्री

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Put politics aside, ask Uddhav Thackeray! Kangana fired questions at Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.