Xiaomi Announces Diwali With Mi Sale: Redmi K20 for Re.1; Price Cuts on Redmi Note 7 Pro, Mi TVs, Mi Band 3 | शाओमीचा धमाका; एक रुपयात स्मार्टफोन, स्वस्तात मस्त टीव्ही!
शाओमीचा धमाका; एक रुपयात स्मार्टफोन, स्वस्तात मस्त टीव्ही!

नवी दिल्ली : शाओमी कंपनीने दिवाळीनिमित्त धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. Diwali With Mi असे या सेलचे नाव आहे. शाओमीचा हा सेल 28 सप्टेंबर ते 4 ऑक्टोंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये एक रुपयांचा फ्लॅश सेल सुद्धा आहे. 

या माध्यमातून ग्राहक Redmi K20, Mi Smart Band 4 सह शाओमीचे अनेक प्रॉडक्ट्स केवळ एक रुपयात खरेदी करु शकणार आहेत. एक रुपया असलेला प्लॅश सेल दररोज संध्याकाळी चार वाजता असणार आहे. Diwali With Mi सेलमध्ये HDFC बँक क्रेडिट कार्ड्स आणि EMI ट्रान्जक्शनवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळणार आहे. शाओमीचा हा सेल Mi.com वर असणार आहे.

4,999 रुपयांत Redmi 7A
सेलमध्ये Redmi 7A स्मार्टफोन 4,999 रुपयांना मिळणार आहे. यात HDFC बँकेच्या कार्डवरुन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. म्हणजे 400 रुपयांचा प्राइस कट असणार आहे.

क्रेझी डील्समध्ये 80 टक्क्यांपर्यंत सूट
या सेलमध्ये Mi Pocket स्पीकर, Mi Travel बॅकपॅकसमवेत अनेक प्रॉडक्ट्सवर 80 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. क्रेझी डील्स, सेलच्यावेळी दररोज सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता असणार आहे. याशिवाय, एमआय ईअरफोन्सवर 50 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. 

Redmi Note 7 Pro वर ऑफर
शाओमीचा Redmi Note 7 Pro स्मार्टफोन दोन हजार रुपयांच्या प्राइस कटसोबत लिस्टेड असणार आहे. याची प्रभावी किमत 11,999 रुपये असणार आहे. फ्लिपकार्टने या कमी किंमतीसोबत फोन लिस्ट जारी केली आहे. फ्लिपकार्ट जुने फोन एक्सचेंज करण्यावर 1000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देत आहे.

Redmi Y3 स्मार्टफोन 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत
शाओमीने या सेलमध्ये Redmi Y3 स्मार्टफोन कमी किंमतीत मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असणार आहे. तर, सेलदरम्यान Redmi K20 Pro स्मार्टफोन 24,999 रुपये आणि  Redmi Note 7S स्मार्टफोन 8,999 रुपयांना मिळणार आहेत.

स्वस्तात मस्त Mi TV
या सेलमध्ये Mi TV आधीच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत आहे. यामध्ये 32 इंचाचा Mi LED TV 4A Pro, Mi LED TV 4C Pro, 43 इंचाचा Mi LED TV 4A Pro  आणि 55 इंचाचा Mi LED TV 4X Pro कमी किंमतीत आहे. 10,000 mAh असलेला Mi Power Bank 2i आणि Mi Band 3 सुद्धा डिस्काउंटमध्ये मिळणार आहे. सेलमध्ये 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर Mi Protect मिळेल. 299 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर Mi Screen Protect मिळेल. Mi TV साठी Mi एक्सटेंडेड वॉरंटी 399 रुपयांना ग्राहक घेऊ शकतील.
 

Web Title: Xiaomi Announces Diwali With Mi Sale: Redmi K20 for Re.1; Price Cuts on Redmi Note 7 Pro, Mi TVs, Mi Band 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.