शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

आता स्मार्टफोन राहणार थंडा थंडा कूल कूल, शाओमीचा नवा पंखा पॉवरफूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 10:46 IST

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमीने एक खास पंखा आणला आहे.

ठळक मुद्देलोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमीने एक खास पंखा आणला आहे. फॅनच्या मदतीने अवघ्या 2 सेकंदात फोन थंड करता येतो.कुलिंग फॅन 67-88mm रुंदी असलेल्या स्मार्टफोनला लावता येतो.

नवी दिल्ली - स्मार्टफोन हा हल्ली सर्वांकडेच असतो. मात्र अनेकदा विविध कारणांमुळे फोन गरम होतो. या समस्येचा सामना बऱ्याचवेळा करावा लागतो. पण आता फोन गरम होत असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी शाओमीने एक खास पंखा आणला आहे. शाओमी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन गोष्टी आणत असते. यावेळी ही स्मार्टफोन थंड ठेवण्यासाठी एका नवा दमदार पंखा आणला आहे. 

शाओमीने काही दिवसांपूर्वी एक्सटर्नल क्लिप-ऑन कूलिंग फॅनची घोषणा केली होती. त्यानंतर आता कंपनीने आपल्या ऑफिशल वेबसाईटवर या नव्या कूलिंग फॅनचा सेल सुरू केला आहे. या फॅनच्या मदतीने अवघ्या 2 सेकंदात फोन थंड करता येतो. शाओमीच्या या खास कूलिंग फॅनची किंमत 129 युआन (जवळपास 1300 रुपये) आहे. हा कुलिंग फॅन 67-88mm रुंदी असलेल्या स्मार्टफोनला लावता येतो. हा एक्सटर्नल फॅन स्मार्टफोनला लावला जातो आणि पॉवर सोर्सला कनेक्ट केला जातो. 

कूलिंग फॅन हा फक्त  2 सेकंदात फोनचं तापमान कमी करण्यास मदत करतो. विविध कारणांसाठी जेव्हा जास्त वेळ फोनचा वापर हा केला जातो तेव्हा फोनचं तापमान वाढतं. प्रामुख्याने स्मार्टफोन गरम होतो. अशावेळी शाओमीचा हा खास फॅन अत्यंत उपयुक्त आहे. या फॅनच्या दोन्ही बाजूला एअर डक्ट्स देण्यात आले असून ते तापमान कमी करण्यासाठी मदत करतात. गेम्स खेळताना हा खास फॅन स्मार्टफोनचं तापमान हे 10 डिग्रीपर्यंत कमी करतो असा दावा शाओमीने केला आहे.

शाओमीचा हा एक्सटर्नल फॅन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. लवकरच तो भारतातही उपलब्ध करण्यात येईल. चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीच्या नव्या फोनबाबत ग्राहकांमध्ये नेहमीच कमालीची उत्सुकता असते. शाओमीने भारतीय बाजारात चांगलाच जम बसविला आहे. Xiaomi चे फोन भारतात सर्वाधिक विकले गेले आहेत. शाओमीने Mi Super Sale चे आयोजन केलं होतं. हा सेल 8 फेब्रुवारीपासून सुरू झाला होता. यामध्ये शाओमीने आपल्या युजर्ससाठी दमदार ऑफर्स दिल्या होत्या. या सेलमध्ये शाओमीच्या Redmi 8A सह अनेक स्मार्टफोनवर दमदार ऑफर्स देण्यात आल्या. 

'या' बातम्या ही नक्की वाचा

आता Google वरून करा फोनचा रिचार्ज ; कसं ते जाणून घ्या

अवघ्या 10 सेकंदात अनलॉक करा स्मार्टफोन, फॉलो करा सोप्या स्टेप्स...

इंटरनेट असुरक्षिततेमुळे जागतिक स्तरावर वाढले हॅकिंग

WhatsApp ला हॅकिंगचा धोका; त्वरित अ‍ॅक्टिव्हेट करा 'हे' सिक्यॉरिटी फीचर्स 

WhatsApp वरच्या सीक्रेट गोष्टी Gmail वर करता येतात सेव्ह, कसं ते जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

हनी ट्रॅप: नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला गोपनिय दस्तावेज पुरविले; 11 अटकेत

आता दुसऱ्या राज्यातून अथवा शहरातून करता येणार मतदान

गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

महिलांच्या छळवणुकीच्या तक्रारींवर आता २४ तासांत कारवाई

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ‘एल्गार’बाबत चर्चेची शक्यता

 

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल