गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 08:06 AM2020-02-17T08:06:32+5:302020-02-17T08:36:00+5:30

गुन्हा दाखल करण्यास शासनाची टाळटाळ

... and a stolen lake was found in varsova; Bjp EX MLA behind that | गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

गेली सत्ता अन् आमदारकी, फसला भाजपा नेत्याचा डाव; अखेर सापडला 'चोरीस' गेलेला तलाव

Next
ठळक मुद्देवरसावे नाकाच्या एकस्प्रेस इन हॉटेल कडून जाणाऱ्या रस्त्यावर मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे. सातबारा नोंदी देखील सदर तलाव सरकारी असल्याची नोंद असुन त्याचे सुमारे ८ हजार चौ.फुट इतके क्षेत्र आहे.एप्रिल २०१६ पासुन आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने त्यावेळी आमदार नरेंद्र मेहतांचे नावानिशी सदर सरकारी तलावात भराव केल्याची तक्रार केली होती.

लोकमत न्युज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे येथे असलेला सरकारी तलाव माफियांनी चोरल्याच्या आदिवासींसह श्रमजीवी संघटनेच्या तक्रारींवर कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयावर लोकमत मधून टीकेची झोड उठताच आता तलाव चोरांनी पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम सुरु करुन सरकारी तलाव परत करण्याचे काम सुरु केले आहे. भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांनी मात्र दोन दिवसांपुर्वीच तलाव चोरीला गेला नसुन त्याचे उलट सुशोभिकरण केल्याचा दावा करत दुसराच तलाव दाखवला होता. पण आज रविवारी तलावाचे खोदकाम सुरु केल्याने तलावचोरांचे पितळ उघडे पडले आहे. तर गुन्हा दाखल करा, अशी मागणी श्रमजीवीने केली आहे.

वरसावे नाकाच्या एकस्प्रेस इन हॉटेल कडून जाणाऱ्या रस्त्यावर मेहतांच्या ७११ हॉटेल्स कंपनीचे सी एन रॉक हॉटेल आहे. या भागातील जवळपास सर्वच जमीन ७११ हॉटेल्सच्या ताब्यात असुन या ठिकाणी लागुनच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द आहे. त्यात डोंगर असुन पावसाळ्यात येणारे पाणी खाली खाजगी जागेत नैसर्गिकरीत्या साचुन तलाव व पाणथळ आहेत. वन हद्द असल्याने त्या लगतचा परिसर देखील इको सेंसेटिव्ह झोन मध्ये येत आहे.

याच वन हद्दी लगत सर्व्हे क्र. ९० मध्ये पुर्वी पासुनचे नैसर्गिक पाणथळ - तलाव होते. सातबारा नोंदी देखील सदर तलाव सरकारी असल्याची नोंद असुन त्याचे सुमारे ८ हजार चौ.फुट इतके क्षेत्र आहे. सदर सरकारी तलावाचा पुर्वी पासुन आदिवासी वापर करत आले असुन वन विभागाच्या कुंपण भिंत बांधण्याआधी वन्य जीव या भागातील तलाव - पाणथळ वर पाणी पिण्यासाठी येत. आता देखील माकड आदी वन्यजीव तसेच पक्षी येत असल्याचे आदिवासींचे म्हणणे आहे.

मेहतांच्या ७११ हॉटेल्स कं. नीने सातबारा नोंदी सरकारी तलाव असताना या जागेत भराव सुरु केला. एप्रिल २०१६ पासुन आदिवासींसह श्रमजीवी संघटनेने त्यावेळी आमदार नरेंद्र मेहतांचे नावानिशी सदर सरकारी तलावात भराव केल्याची तक्रार केली होती. सतत तक्रारी अर्ज देऊन देखील जिल्हाधिकारी, तहसिलदार व त्यांच्या अधिनस्त अधिकारी तसेच महापालिका आयुक्त व पालिका अधिकाऱ्यांनी राजकीय माफियांच्या वरदहस्तामुळे कोणतीच कारवाई केली नाही. दुसरीकडे बेधडक भराव सुरुच ठेवण्यात येऊन तलावच बुजवण्यात आला व सभोवताली कुंपण घालुन लॉन बनवण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व आयुक्त बालाजी खतगावकर यांनी तलाव चोरणाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असे आरोप होऊ लागले.



मंगळवार ११ फेब्रुवारी रोजी श्रमजीवी संघटनेने महापालिकेवर मोर्चा काढला त्यात देखील वरसावेचा सरकारी तलाव चोरीला गेल्याचा मुद्दा बाळाराम भोईर यांनी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्या कडे मांडला. पण आयुक्तांनी चक्क तो तलाव सरकारी असुन पालिकेला हस्तांतरीत झालेला नाही असे सांगुन आपले हात झटकले. परंतु या प्रकरणी लोकमतने बातमी प्रसिध्द केल्या नंतर मात्र सरकारी यंत्रणा हालचाल करु लागली. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी महसुल अधिकारायांनी जाऊन केली. तर दुसरीकडे नरेंद्र मेहतांनी मात्र सरकारी तलाव चोरीला गेल्याचे खोटे असुन तलाव जागेवर आहे आणि त्याठिकाणी सुशोभिकरण केल्याचे सांगत तलाव असल्याचे फोटो देखील दाखवले.

तर मेहतांनी दाखवलेले फोटोच खोटे असुन ते जवळ असलेल्या दुसराया तलावाचे आहेत. सरकारी तलावाचे नाहित असे श्रमजीवी संघटनेचे बाळाराम भोईर, रविंद्र गायकर आदिंनी स्पष्ट केले. महापालिका व महसुल प्रशासन सरकारी तलावा चोरीला जाण्यास कारणीभूत असुन तलाव चोरणारे मेहता व त्यांच्या ७११ कंपनीची लोकं असल्याने अशा राजकीय माफियांना संरक्षण दिले जात असल्याचा थेट आरोप श्रमजीवी ने केला. सरकारी तलाव व पाणथळ नष्ट करणे, सरकारी मालमत्ता बळकावणे, बेकायदा भराव - बांधकाम करणे प्रकरणी गुन्हा दाखल करा व तलाव - पाणथळ पुर्ववत करा अशी मागणी त्यांनी के ली.

खोदकाम कशासाठी?

अखेर आज रविवारी सदर सर्व्हे क्र. ९० मधील सरकारी तलाव पोकलेनच्या सहाय्याने खोदण्याच्या कामास सुरवात झाली आहे. पोकलेन ने खोदकाम करुन पुन्हा तलाव निर्माण केला जात आहे. खोदलेली माती डंपरने भरुन नेली जात आहे. त्यामुळे सदर तलाव हा मेहतांच्या ७११ कंपनीने चोर,ल्याचा आमचा आरोप खरा ठरला असुन यात गुन्हे दाखल करा आणि बेजबादार पालिका व सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित करुन सह आरोपी करा अशी मागणी श्रमजीवी संघटनेने केली आहे.

या आधी सदर भागात ७११ हॉटेल्स कंपनीने नैसर्गिक पाणतळ - तलावात मोठ्या प्रमाणात भराव करुन त्यात बांधकामे केली गेली. इको सेंसेटीव्ह झोन असुनही डोंगर फोडला गेला व मोठ मोठी झाडे मारण्यात आली. वन विभागाने पाहणी करुन अहवाल दिला तर इको सेंसेटीव्ह झोन समितीत चर्चा झाली. पण अजुनही गुन्हा दाखल झाला नाही वा कार्यवाही केली गेली नाही.

Web Title: ... and a stolen lake was found in varsova; Bjp EX MLA behind that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.