राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ‘एल्गार’बाबत चर्चेची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 06:07 AM2020-02-17T06:07:11+5:302020-02-17T06:07:16+5:30

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत आज बैठक

The possibility of discussion on 'Elgar' at a meeting of NCP ministers | राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ‘एल्गार’बाबत चर्चेची शक्यता

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बैठकीत ‘एल्गार’बाबत चर्चेची शक्यता

Next

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. त्यात एल्गार परिषदेच्या तपास व त्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली होती. त्यावर पवार यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

दक्षिण मुंबईतील यशवंतराच चव्हाण प्रतिष्ठान येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांना देण्यात आल्या आहेत. कायदा सुव्यवस्था हा राज्याचा विषय असताना केंद्र सरकारने परस्पर हा तपास स्वत:कडे घेणे अयोग्य आहे. शिवाय, त्याला राज्याने मान्यता देणे त्याहून अयोग्य आहे. तपासाची सूत्रे एनआयएकडे गेली असली तरी राज्याने स्वतंत्र तपास करावा, अशी भूमिकाही पवार यांनी मांडली आहे. बैठकीत २४ फेब्रुवारीपासून सुरू होणारे राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, महाविकास आघाडी सरकारच्या कारभारासह राज्यातील महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
शरद पवार दर महिन्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतात. जानेवारी महिन्यातही अशा प्रकारची बैठक झाली होती. आजच्या बैठकीबाबत आठ दिवसांपूर्वीच मंत्र्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यातील महिला संघटनांचे प्रतिनिधीसुद्धा सोमवारी पवारांची भेट घेणार आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय
नागरिक नोंदणीविरोधातील आंदोलनांबाबत यावेळी खलबते होणार आहे.
नाशिकहून पवार अचानक परतल्याने वेगळी चर्चा
वकील परिषदेच्या समारोपानिमित्त उपस्थित राहण्यासाठी नाशिकला आलेले पवार यांनी परिषदेला उपस्थित न राहता अचानक मुंबईला गेले. त्यामुळे राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू होती.

Web Title: The possibility of discussion on 'Elgar' at a meeting of NCP ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.