शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

वेगवान चार्जिंग आणि 108MP च्या जबरदस्त कॅमेऱ्यासह Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro सादर 

By सिद्धेश जाधव | Published: September 16, 2021 11:51 AM

Xiaomi 11T and Xiaomi 11Pro India price: शाओमीने आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro सादर केले आहेत.

ठळक मुद्दे Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते.Xiaomi 11T मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची खासियत यातील 108MP चा मुख्य सेन्सर आहे

Xiaomi ने काल एका लाँच इव्हेंटचे आयोजन केले होते. या इव्हेंटच्या माध्यमातून कंपनीने Xiaomi 11T 5G सीरीज अंतर्गत Xiaomi 11T 5G आणि Xiaomi 11T Pro 5G असे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारात सादर केले आहेत. ही ‘Mi’ ब्रॅंडिंगविना आलेली कंपनीची पहिली सीरिज आहे.  

Xiaomi 11T चे स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi 11T मधील डिस्प्लेवर कंपनीने खूप काम केल्याचे दिसते. यातील 6.67-इंचाचा FHD+ TrueColour डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, आयकेयर मोड, 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास Victus लेयर प्रोटेक्शनसह सादर करण्यात आला आहे. या 5G फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 Ultra चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 256GB ची इंटरनल स्टोरेज मिळते. फोन Android 11 OS सह MIUI 12.5 कस्टम स्किनवर चालतो.  

Xiaomi 11T मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपची खासियत यातील 108MP चा मुख्य सेन्सर आहे. ज्याला 120-डिग्री FoV असलेल्या 8MP च्या अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरा आणि 3x झूम देणाऱ्या टेली-मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. तसेच पॉवर बॅकअपसाठी Xiaomi 11T मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Xiaomi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स 

नावावरून समजले असेल कि Xiaomi 11T Pro या सीरिजमधील पॉवरफुल फोन आहे. स्पेसिफिकेशन्समधून देखील ही पॉवर दिसून येते. कारण या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 888 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12.5 वर चालतो. शाओमी 11T मध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 20:9 अस्पेक्ट रेश्यो, 480Hz टच रिस्पॉन्स रेट, डॉल्बी विजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस लेयरसह 6.67-इंचाचा FHD+ TrueColor डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 12GB रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते आहे.  

या फोनची खासियत म्हणजे या फोनचा चार्जिंग स्पीड. Xiaomi 11T Pro मधील 5000mAh ची बॅटरी 120W इतक्या जबरदस्त वेगाने चार्ज करता येते. हा फोन फक्त 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो. बेस मॉडेलप्रमाणे या फोन मध्ये देखील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 108MP चा सॅमसंग HM2 मुख्य सेन्सर, 8MP ची 119-डिग्री अल्ट्रा-वाईड-अँगल लेन्स आणि 3x झूमसह 8MP टेलीमॅक्रो सेन्सर आहे. हा 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Xiaomi 11T आणि Xiaomi 11T Pro ची किंमत 

  • Xiaomi 11T (8GB + 128GB): Euro 549 (जवळपास 47,700 रुपये)  
  • Xiaomi 11T (8GB + 256GB): Euro 599 (जवळपास 52,000 रुपये)  
  • Xiaomi 11T Pro (8GB + 128GB): Euro 649 (जवळपास 56,400 रुपये) 
  • Xiaomi 11T Pro (8GB + 256GB): Euro 699 (जवळपास 60,800 रुपये)  
  • Xiaomi 11T Pro (12GB + 256GB): Euro 749 (जवळपास 65,100 रुपये) 

सध्या हे फोन युरोपियन बाजारात दाखल झाले आहेत, लवकरच हे फोन भारतीयांच्या भेटीला देखील येतील अशी अपेक्षा आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड