कोण आहे अलेक्झांडर वांग? मार्क झुकरबर्ग देणार तब्बल 1.16 लाख कोटी रुपये, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 17:38 IST2025-10-11T17:37:27+5:302025-10-11T17:38:13+5:30
Who is Alexandr Wang28 वर्षीय अलेक्झांडर वांग Meta मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे.

कोण आहे अलेक्झांडर वांग? मार्क झुकरबर्ग देणार तब्बल 1.16 लाख कोटी रुपये, कारण...
Who is Alexandr Wang: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या मेटा (Meta) ने आर्टिफिशीअल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठी चाल खेळली आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 28 वर्षीय अलेक्झांडर वांग याला मेटाच्या AI प्रमुखपदी नियुक्त केले आहे. या नियुक्तीअंतर्गत मेटाने वांगच्या स्टार्टअपमध्ये तब्बल 14 अब्ज डॉलर्स (सुमारे ₹1.16 लाख कोटी) इतकी गुंतवणूक केली आहे.
अलेक्झांडर वांग आता मेटाच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प “Superintelligence Labs” चे नेतृत्व करेल. या प्रकल्पाचा उद्देश मानवसमान बुद्धिमत्तेची प्रणाली (human-like intelligence systems) विकसित करणे आहे.
अलेक्झांडर वांगचा परिचय?
न्यू मेक्सिको येथील रहिवासी अलेक्झांडर वांग आता मेटाच्या संपूर्ण AI धोरणाचा मुख्य चेहरा असेल. वांगला मेटाच्या Superintelligence Labs चा Chief Architect आणि Head of AI Operations बनवण्यात आले आहे. Google, Microsoft आणि OpenAI सारख्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी मेटाने रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वांगची नियुक्ती केली आहे.
20व्या वर्षी अब्जाधीश झालेला वांग
MIT कॉलेजमधून बाहेर पडून वांगने 2016 मध्ये वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी Scale AI नावाने स्टार्टअप सुरू केले होते. तेव्हा त्याने आपली भागीदार लूसी गुओ सोबत सिलिकॉन व्हॅलीतील स्टार्टअप अॅक्सेलरेटर प्रोग्राममधून या प्रवासाची सुरुवात केली. आज Scale AI ही जगातील अग्रगण्य डेटा लेबलिंग आणि एआय ट्रेनिंग कंपनी आहे, ज्याचे मूल्यांकन 14 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले आहे. ही कंपनी गिग वर्कर्समार्फत मोठ्या टेक कंपन्यांना ट्रेनिंग डेटा उपलब्ध करून देते. Nvidia, Amazon आणि आता Meta हे या कंपनीचे प्रमुख गुंतवणूकदार आहेत.