जेव्हा अॅपलच्या Siri ला Oneplus ने प्रश्न विचारला...उत्तर पाहा काय आले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 17:14 IST2019-01-31T16:24:19+5:302019-01-31T17:14:39+5:30
जगभरात अॅपल आपल्या आयफोन आणि मॅकबूकसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या कंपनीला चीनची वनप्लस ही कंपनी तगडे आव्हाऩ देत आहे.

जेव्हा अॅपलच्या Siri ला Oneplus ने प्रश्न विचारला...उत्तर पाहा काय आले...
नवी दिल्ली : जगभरात अॅपल आपल्या आयफोन आणि मॅकबूकसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, आता या कंपनीला चीनची वनप्लस ही कंपनी तगडे आव्हाऩ देत आहे. अॅपल- सॅमसंगचे युद्ध तर सर्वांनाच परिचित असताना वनप्लसने अॅपलच्या सिरी या असिस्टंटलाच प्रश्न विचारून पुरती टेर उडविली आहे.
वनप्लसने अॅपलच्या सिरी या व्हर्च्युअल असिस्टंटला भारतात पहिल्या पसंतीचा प्रिमिअम स्मार्टफोन कोणता, असा प्रश्न विचारला. तेव्हा आलेले उत्तर अॅपलसाठी धक्कादायक होते. सिरीने अॅपलच्या बाजुने न राहता थेट वनप्लस असे उत्तर दिले. यावरून वनप्लसने अॅपलला ट्रोल करत टेर खेचली.
iDare you pic.twitter.com/iSstVVv0aI
— OnePlus India (@OnePlus_IN) January 30, 2019
काऊंटरपॉईंटने नुकताच भारतातील स्मार्टफोन बाजाराचा एक अहवाल सादर केला आहे. यामध्ये वनप्लसला भारतातील वेगाने वाढणारा प्रिमिअम श्रेणीतील ब्रँड असल्याचे म्हटले आहे. वनप्लसच्या ट्विटमध्ये थेट अॅपलचे नाव घेतलेले नसले तरीही सिरीचा उल्लेख मात्र केला आहे. तसेच याचा स्क्रीनशॉट काढून 'iDare you' असे कॅप्शन दिले आहे.